शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

‘रमजान’मध्ये सर्व धर्मीयांच्या सलोख्याचे दर्शन

By admin | Updated: July 14, 2015 19:49 IST

गडहिंग्लजला २० मस्जिदी : सामाजिक ऐक्य अबाधित, सर्व धर्मीय इफ्तार पार्टीचे आयोजन

राम मगदूम- गडहिंग्लज --लोकसंख्येच्या तुलनेत अन्य धर्मीयांपेक्षा अत्यल्प संख्या असली तरी गडहिंग्लज तालुक्यात मुस्लिम बांधव आणि अन्य धर्मीयांतील सामाजिक ऐक्य अनेक वर्षांपासून अबाधित आहे. सर्व सणांत सर्व धर्मीयांचा उत्साही सहभाग असतो. अनेक मुस्लिम बांधव नवरात्रीचे उपवास करतात, तर अनेक हिंदू बांधव रमजानचे रोजे करतात. त्यामुळे येथील ‘रमजान’मध्ये सर्व धर्मीयांच्या सलोख्याचे दर्शन घडते. गडहिंग्लज शहरात तीन, तर तालुक्यात मिळून २० मस्जिदी आहेत. पवित्र रमजाननिमित्त सर्व मस्जिदीमध्ये नमाज, तरावीह पठण, रोजा, इफ्तार, आदी धार्मिक विधी होत आहेत. गडहिंग्लजसह नेसरी व हलकर्णी येथे सर्व धर्मीय इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. गडहिंग्लज शहरातील संकेश्वर रोडवरील सुन्नी जुम्मा मस्जिद ही सर्वांत जुनी मस्जिद आहे. याशिवाय हुजरे गल्लीत मरकज मस्जिद, तर मेटांच्या मार्गनजीक मदिना मस्जिद आहे. यापैकी केवळ मरकज मस्जिदीतच तबलीग जमातीचे कार्य चालते. मात्र, सर्व धर्मीयांच्या लोकवर्गणीतूनच ही मस्जिद बांधण्यात आली आहे, हे या मस्जिदीचे वैशिष्ट्य आहे. सुन्नी जुम्मा मस्जिदीचा जीर्णोद्धार तत्कालीन जिम्मेदार मन्सूरभाई मुल्ला यांनी केला. प्रशस्त मस्जिदीसह वजूखाना व स्वच्छतागृहाची सोय केली. नुकतेच मस्जिदीच्या परिसरात काही दुकानगाळे काढून त्यांनी मस्जिदीच्या देखभाल दुरुस्तीची आर्थिक व्यवस्था करून ठेवली आहे. सर्वसोयींनीयुक्त व आदर्श मस्जिद म्हणून ओळखली जाणारी मरकज मस्जिदचे व्यवस्थापक घुडुसाब शेख, सेक्रेटरी हारुण सय्यद व सहकाऱ्यांनी लोकवर्गणीतून बांधली आहे. या मस्जिदीची शाखा म्हणजेच मदिना मस्जिद होय. मुश्ताक खलिफा हे या मस्जिदीचे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात.हसूरचंपू, नूल-हलकर्णी, खणदाळ, बसर्गे, निलजी, करंबळी, डोणेवाडी, गिजवणे, महागाव, ऐनापूर, नेसरी, कडगाव व वडगाव या ठिकाणीही मस्जिदी आहेत. ‘एतिकाफ’साठी मस्जिदीत मुक्काममहिना रमजानचासामाजिक सलोख्याचा !सध्या रमजानमधील शेवटच्या टप्यात येणारा एतिकाफ हा धार्मिक विधी सुरू आहे. या कालावधीत येणारी ‘शब-ए-कद्र’ ही रात्र पवित्र रात्र मानली जाते. या रात्रीच्या उपासनेला इस्लाम धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे एतिकाफसाठी सर्व मस्जिदींमध्ये काही मुस्लिम बांधव मुक्कामास आहेत. त्यांच्याकडून अल्लाहाची इबादतसह समस्त मानव समाजासाठी दुआ (प्रार्थना) मागितली जाते.