बँक एम्प्लॉईज युनियनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
केंद्र सरकारचे कामगार, शेतकरी विरोधी धोरणे व कायदे असून ते रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव सभेत करण्यात आला. यावेळी तानाजी पाटील, संजीव पुराणिक, सुनील पाटील, एन. एस. मिरजकर यांच्यासह जिल्हा बँकेतील अनुकंपा कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. युनियनचे जनरल सेक्रेटरी एन. एस. मिरजकर यांनी मागील सभेचे प्रोसेडिंग वाचन केले. सचिव प्रकाश जाधव यांनी अहवाल वाचन केले. सचिव गोपाळ पाटील यांनी पेन्शन लढ्याबद्दल माहिती दिली. युनियनचे उपाध्यक्ष दिलीप लोखंडे यांनी आभार मानले. सभेला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील तीन जिल्हा बँका व २० सहकारी बँकांतील ७० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
फोटो ओळी : बँक एम्प्लॉईज युनियनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अतुल दिघे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुरलीधर कदम, दिलीप लोखंडे, अविनाश खलाटे आदी उपस्थित होते. (फोटो-१४१२२०२०-कोल-बँक एम्प्लॉईज)
- राजाराम लोंढे