शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

आयोगासमोर कोल्हापूरच्या मनपा अधिकाऱ्यांची दांडी

By admin | Updated: May 22, 2017 17:30 IST

शासकीय अध्यादेश डावलू नका, अंमलबजावणी करा : पवार

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २२ : मेहतर वाल्मीकी समाजातील सफाई कर्मचाऱ्यांची भरती, बढती, वारसा नोकऱ्या, त्यांना देण्यात येणारी मोफत घरे, कर्मचाऱ्यांच्या मुलांना दिली जाणारी शिष्यवृत्ती, मोफत गणवेश, सामाजिक व भौतिक सुविधा इत्यादींबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देता न आल्याने महानगरपालिका अधिकाऱ्यांची सोमवारी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या अध्यक्षांसमोर अक्षरश: दांडी उडाली. त्यामुळे निराश झालेल्या आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार यांनी शासकीय अध्यादेश आणि कायद्याकडे दुर्लक्ष करू नका, तर त्याची अंमलबजावणी करा, अशी सक्त ताकीद आयुक्त अभिजित चौधरी यांना दिली.

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार यांनी सोमवारी महानगरपालिका कार्यालयास भेट देऊन सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवा, सुविधा आणि साधनांबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत माजी प्रधान सचिव नरोत्तम चव्हाण, अ‍ॅड. कबीर बिवाल, अ‍ॅड. फकीरचंद वाल्मीकी, सुनील मोहीर,अशोक मारोडा, प्रकाश सनगत बैठकीस उपस्थित होते.आयुक्त चौधरी यांच्यासह महापालिकेचे झाडून सगळे अधिकारी, तसेच महापौर हसिना फरास, स्थायी समितीचे सभापती संदीप नेजदार, नगरसेवक संतोष गायकवाड, किरण नकाते, कर्मचारी संघाचे अध्यक्ष रमेश देसाई, सेक्रेटरी बाबूराव ओतारी उपस्थित होते.

प्रभारी सहायक आयुक्त संजय भोसले यांनी महापालिके तील सफाई कर्मचाऱ्यांचा आकृतिबंद सांगितला. भरतीची प्रक्रिया, वारसा नोकरी देतानाची प्रक्रिया यांची माहिती दिली; परंतु त्याने आयोगाच्या अध्यक्षांचे समाधान झाले नाही. शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता किती आहे, अशी विचारणा केल्यावर भोसले यांनी ९२५ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. तेव्हा अध्यक्ष पवार यांनी ही भरती का केली नाही, अशी विचारणा केली. त्यावर प्रशासन निरुत्तर झाले.

कर्मचारी भरतीचा परिपूर्ण व सक्षम प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठवा, शासनाकडून काही त्रुटी निघणार नाहीत याची काळजी घ्या. जर हा प्रस्ताव लवकर गेला नाही तर त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करावी लागेल, असा इशारा पवार यांनी दिला. सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबतच्या शासन अध्यादेशाकडे गांभीर्याने न पाहणे ही गंभीर बाब आहे. शासनाचे कायदे तुम्हाला पाळायचे आहेत की नाहीत, अशी थेट विचारणाच पवार यांनी केली. अनेक प्रश्नांची उत्तरे देताना अधिकाऱ्यांची बोबडी वळली. त्यामुळे आश्वासने देण्यावर अधिक जोर द्यावा लागला. तीस दिवसांत प्रक्रिया पूर्ण करा एखादा कर्मचारी सेवानिवृत्त झाला किंवा वैद्यकीय कारणारने अनफिट ठरला, तर त्याच्या वारसाला ३० दिवसांत नोकरी दिली पाहिजे. त्याची अंमलबजावणी करावी. जर एखाद्या कर्मचाऱ्याने शैक्षणिक पात्रता धारण केली असेल, तर त्याला त्याच्या शिक्षणाप्रमाणे नोकरी द्यावी., एखादा कर्मचारी डबल ग्रॅज्युएट असेल तर त्याच्या हातात झाडू न देता त्याच्या योग्यतेचे काम द्या, अशा सूचना पवार यांनी केल्या.

जातीयवादी धोरण नको

मागच्या आयोगाच्या अध्यक्षांच्या बैठकीवेळी झालेले निर्णय आणि त्याचा इतिवृत्तांत यामध्ये परस्पर विसंगत माहिती समोर आल्याने आयोगाचे अध्यक्ष पवार काहीसे संतप्त झाले. आयोगाला माहिती व्यवस्थित दिली जात नाही. आम्हाला त्याबाबत जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागले. जातीयवादी, पक्षपाती धोरण स्वीकारले जाऊ नये. प्रशासनाने प्रशासन म्हणूनच काम करावे. अधिकाऱ्यांनी त्यांचे विषय प्रतिष्ठेचे करू नयेत, अशी समज पवार यांनी दिली.

आयोगाने दिलेले आदेश

सफाई कर्मचाऱ्यांची संख्या ९२५ पर्यंत वाढवावी.

 वारसा नोकऱ्या देताना आढेवेढे घेऊ नका.

क ागदपत्रांची संख्या वाढवू नका. 

पदवीधर, पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असलेल्याना तत्काळ बढती द्यावी.  

मनपा बजेटच्या पाच टक्के खर्च हा सफाई कर्मचाऱ्यांवर करावा.  

कर्मचाऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती द्यावी.

 कर्मचाऱ्यांना मोफत घरे देण्याची योजना राबवावी. त्यासाठी भूखंड आरक्षित ठेवावेत.

मोफत गणवेश, गमबूट, हातमोजे यांच्यासह अन्य साधणे तत्काळ पुरवावीत.

कोणत्याही गोष्टीत कर्मचाऱ्यांची अडवणूक न करता त्यांची कामे तत्काळ करावीत.