शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

तमदलगे येथे अपघातात वळीवडेचे पिता-पुत्र ठार

By admin | Updated: April 4, 2016 01:10 IST

रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास अपघात

जयसिंगपूर : कोल्हापूर-सांगली महामार्गावर तमदलगे (ता. शिरोळ) येथे मोटारसायकल व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील पिता-पुत्र जागीच ठार झाले. विजय जयवंत माने (वय ३५) व शमुवेल विजय माने (९, दोघे रा. मेघराज कॉलनी, वळीवडे, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली आहे. दानोळी येथे नातेवाइकांकडे माने पिता-पुत्र आले होते. गावी परतताना हा अपघात झाला. याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, विजय माने व शमुवेल माने हे मोटारसायकलवरून गांधीनगर-वळीवडेकडे निघाले होते, तर ट्रक कोल्हापूरहून जयसिंगपूरच्या दिशेने येत होता. तमदलगे येथे ट्रकने मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात माने पिता-पुत्र जागीच ठार झाले. या अपघातात मोटारसायकलचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच जयसिंगपूरचे पोलिस उपनिरीक्षक सत्यराज घुले, प्रकाश घोडके, हवालदार गजानन कोष्टी यासह कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. दानोळी येथे नातेवाइकांकडे माने पिता-पुत्र हे दोघेजण आले होते. दरम्यान, गावाकडे परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. विजय माने यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.