कारखान्याचे आजअखेर ३१ दिवसांत २ लाख ४३ हजार २४० मॅट्रीक टनाचे गाळप होऊन २ लाख ५० हजार ६०० पोती साखर उत्पादित झाली आहे.
गतवर्षी कारखान्याने ९ लाख १० हजार मॅट्रीक टन ऊस गाळप करून १२.६२ टक्के साखर उतारा होता. तथापि, कारखान्याने सुमारे पन्नास टक्के गाळप केलेल्या उसापासून बी. हेवी मोलॅसिस निर्मिती केल्याने त्यातील साखरेचा उतारा गृहित धरून १३.२९ टक्के साखर उतारा मिळाल्याने दत्त दालमियाची प्रतिटन ३१०१ रुपये एफआरपी जाहीर करण्यात आली. त्याप्रमाणे ३ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरपर्यंतचे ३० कोटी रुपये ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर विनाकपात जमा करण्यात आले. तसेच ऊस तोडणी-ओढणीच्या पहिल्या पंधरवड्याची बिले दोन दिवसांत जमा करण्यात येणार असल्याचे पालीवाल यांनी सांगितले.
पत्रकार बैठकीत जनरल मॅनेजर (केन) श्रीधर गोसावी, एच. आर. प्रमुख आनंद कामोजी, अकौंटंट प्रमुख सुनील लाहोटी, वरिष्ठ मॅनेजर केन संग्राम पाटील, मॅनेजर (केन) शिवप्रसाद गोसावी, विनय आरवाडे, हेमंत जाधव, एम. एम. पाटील, आदी उपस्थित होते.