शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दलित अत्याचारप्रश्नी विधिमंडळावर धडक

By admin | Updated: May 13, 2014 00:47 IST

रामदास आठवले : वाढते अत्याचार हा महाराष्ट्राला कलंक

कोल्हापूर : पुरोगामी विचाराच्या राज्यात दलितांवरील अत्याचार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना गृहमंत्री अत्याचार कमी झाल्याचा डांगोरा पिटत दिशाभूल करत आहेत. दलितांवरील वाढते अत्याचार हा महाराष्टÑाला लागलेला कलंक असल्याची खंत ‘रिपाइं’(आठवले गट)चे राष्टÑीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी ‘रिपाइं’ युवक आघाडीच्या वतीने २ जूनला विधिमंडळावर धडक देण्यात येणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. दलित अत्याचारविरोधी शांतता समितीची स्थापना करावी, अशी मागणी करत राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला ३५ ते ३६ जागांवर निश्चित यश मिळणार असून, केंद्रात ‘एनडीए’चे सरकार स्थापन होऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आज (सोमवार) ‘रिपाइं’च्या चिंतन शिबिरासाठी कोल्हापुरात आले असता खा. आठवले बोलत होते. आठवले म्हणाले, राज्यात २०१३ मध्ये दलितांवर १६३३ ठिकाणी अत्याचार झाले, तरीही गेल्यावर्षीपेक्षा अत्याचार कमी झाल्याचा दावा गृहमंत्री आर. आर. पाटील करत आहेत. अत्याचारांच्या संख्येपेक्षा ते होऊ नयेत, यासाठी राज्य शासनाने काय केले? सर्वच गावे व मराठा समाज दोषी नाही. मूठभर जातीयवादी विष पेरण्याचे काम करतात. येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांची भेट घेऊन अत्याचार वाढत असल्याचे पुरावे देणार आहे. अशा घटना टाळण्यासाठी प्रत्येक गावात दलित अत्याचारविरोधी शांतता समिती स्थापना केली पाहिजे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याला अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक व स्वतंत्र यंत्रणा द्यावी. जेणेकरून अशा घटना स्थानिक पातळीवरच मिटवण्यात यश येऊ शकेल. रामदेवबाबांनी दलितांबद्दल वापरलेली भाषा चुकीची होती, पण त्यांना दलितांचा अपमान करायचा नव्हता. त्याबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे. तरीही विविध ठिकाणी त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी. दलित नेत्यांच्या एकीकरणासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. इतर गट महायुतीत आले तर त्यांचे स्वागतच करू, असेही आठवले यांनी सांगितले. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात आपणाला निश्चित स्थान मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रा. शहाजी कांबळे, गौतम भालेराव, उत्तम कांबळे, पी. के. जैन, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)