शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शहीद राजू जाधव मेमोरियल फौंडेशनतर्फे २३ पासून दाजीपूर पदभ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 14:36 IST

कोल्हापूर येथील शहिद राजू जाधव मेमोरियल फौंडेशनतर्फे दि. २३ ते २५ डिसेंबरदरम्यान गगनगड ते दाजीपूर अशी घनदाट जंगलातील साहसी पदभ्रमंती मोहिम राबविण्यात येणार आहे. कॅम्प लिडर पोलिस निरिक्षक संजय जाधव यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देगगनगडपासून दाजीपूरपर्र्यत घनदाट जंगलातील साहसी पदभ्रमंतीचा थरार १९७८ पासून दाजीपूर पदभ्रमंती मोहिम२0१८ मध्ये सेव्हन सिस्टर मोहिम

कोल्हापूर : येथील शहिद राजू जाधव मेमोरियल फौंडेशनतर्फे दि. २३ ते २५ डिसेंबरदरम्यान गगनगड ते दाजीपूर अशी घनदाट जंगलातील साहसी पदभ्रमंती मोहिम राबविण्यात येणार आहे. कॅम्प लिडर पोलिस निरिक्षक संजय जाधव यांनी ही माहिती दिली.

जाधव मेमोरियल फौंडेशनतर्फे दरवर्षी साहसी मोहिमांचे आयोजन करण्यात येते. साहसी मोहिम आणि फौंडेशन असे समीकरणच झाले आहे. यंदाही कोल्हापूर जिल्ह्यातील गगनगडपासून दाजीपूरपर्र्यत घनदाट जंगलातील साहसी पदभ्रमंतीचा थरार अनुभवता येणार आहे.

पहिल्या दिवश्ी मोरजाईचा सडा येथील सूर्यास्त पाहून रात्री स्लाईड शो, आकाश दर्शन, कॅम्प फायर आणि बोरबेटला मुक्काम असे नियोजन आहे. दुसऱ्या दिवश्ी जंगल तुडवत दुपारी एक वाजेपर्यंत बायसन टॉवर, सायंकाळी पाच वाजेपर्यंत गगनगिरी आश्रमात रात्रीचे जेवण, कॅम्प फायर, तिसऱ्या दिवशी दाजीपूरचे जंगलात पदभ्रमंती केल्यानंतर दुपारनंतर कोल्हापूरला परत असे या मोहिमेचे नियोजन आहे.

फौंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प लिडर संजय जाधव, ग्रुप लिडर ऋषिकेश केसकर, नितिन जाधव, सतिश पाटील, क्षितिजा जाधव, संग्राम पाटील (सडोलीकर), सेंट्रल एक्साईजचे सुपरिटेंडेंट राजेंद्र गुंडाळे, अमर पाटील, अविनाश लाड, पोलिस निरिक्षक प्रविण चौगुले, सार्थक जाधव, राजू माने यांच्यासह बोरबेट आणि महादेव मंदिराच्या (गगनगिरी आश्रम) व्यवस्थेसाठीची समिती कार्यरत आहे.१९७८ पासून पदभ्रमंती, २0१८ मध्ये सेव्हन सिस्टर मोहिमकोल्हापूर माउंटेनिअरिंग अ‍ॅडव्हेंचर्स क्लबच्या माध्यमातून १९७८ मध्ये सुरु झालेल्या दाजीपूर पदभ्रमंती मोहिमेत आजतागायत खंड पडलेला नाही. याच क्लबचा हरहुनरी, तडफदार साहसी फौजदार राजू जाधव मुंबईत शीख अतिरेक्यांश्ी झालेल्या धुमश्चक्रीत हुतात्मा झाला.

राजू जाधव यांची आठवण म्हणून १९९२ मध्ये स्थापन झालेल्या फांैडेशनने युवक-युवतींमध्ये साहसी वृत्ती वाढीस लागावी म्हणून हिमालयात अनेक मोहिमा यश्स्वीपणे पार पाडल्या. २0१८ मध्ये सर्वांसाठी १५ दिवसांची नॉर्थ-ईस्ट हिमालयीन सेव्हन सिस्टर मोहिम आयोजित करण्यात आली आहे.

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी फौंडेश्नचे अध्यक्ष अ‍ॅड. विजय जाधव, शारदा हौसिंग सोसायटी, राजारामपुरी, आठवी गल्ली, कोल्हापूर येथे संपर्क साधावा,असे आवाहन केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTravelप्रवास