यावेळी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक जयदीप पाटील म्हणाले, येणारा सन २०२१-२२ हा कारखान्याचा १९ वा गळीत हंगाम आहे. या हंगामात कारखान्याने ५ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठरविलेले आहे. कारखान्याने ठरविलेल्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी गळीत हंगामाची पूर्वतयारी सुरू असून, शेतकऱ्यांनी पिकविलेला संपूर्ण ऊस कारखान्याकडे गळीतास पाठवून सर्वांनी सहकार्य करावे.
कार्यक्रमास कारखान्याचे संचालक बजरंग पाटील, दत्तात्रय पाटणकर, चंद्रकांत खानविलकर, बंडोपंत कोटकर, जयसिंग ठाणेकर, शामराव हंकारे, उदय देसाई, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. सेक्रेटरी नंदू पाटील यांनी आभार मानले.
फोटो ओळ – असळज – येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कारखान्याच्या रोलर पूजनप्रसंगी कारखान्याचे संचालक खंडेराव घाटगे, बजरंग पाटील, चंद्रकांत खानविलकर, जयसिंग ठाणेकर, उदय देसाई, शामराव हंकारे उपस्थित होते.