नवे पारगाव : तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात (बी. टेक. ॲग्री.) अभियंता दिन साजरा झाला. डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन प्रमुख उपस्थित होते.
कृषी अभियंता सुप्रिया चव्हाण यांचे अन्न प्रक्रिया उद्योगातील कृषी अभियंत्यांना असणाऱ्या संधी, तर सुधाकर पांनिरे यांनी अभियंत्यांची भूमिका व आवश्यक कौशल्य या विषयावर व्याख्यान झाले.
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील यांच्या हस्ते झाले. डॉ. प्रथापन यांनी सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या उपक्रमांची प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील यांनी माहिती दिली. प्रा. पी. डी. ऊके, प्रा. एस. एम. पाटील, प्रा. एम. बी. खेडकर, प्रा. के. आर. पवार यांची भाषणे झाली.
फोटो ओळी : तळसंदे येथे अभियंता दिनानिमित्त सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभिवादन करताना प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील व प्रा. पी. डी. ऊके. सोबत प्राध्यापक उपस्थित होते.
१६ तळसंदे डीवायपी अभियंता