शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजकर पर्यावरणासाठी चालविणार सायकल

By admin | Updated: December 31, 2016 01:16 IST

सायकल क्लबची स्थापना : विविध सेवाभावी संस्था, संघटनांचा सहभाग; आणखी एक पुरोगामी पाऊल --गुड न्यूज

राम मगदूम--गडहिंग्लजवाढत्या वायू व ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्याबरोबरच इंधन व पैशांची बचत आणि शहरातील वाहतुकीच्या समस्येची कोंडी फोडण्यासाठी सायकलीचा अधिकाधिक वापर करण्याचा निर्धार गडहिंग्लजकरांनी केला आहे. सरत्या वर्षाला अभिनव पद्धतीने निरोप देताना नियमित सायकल चालविण्याचा संकल्प सोडून गडहिंग्लजकरांनी आणखी एक पुरोगामी पाऊल टाकले आहे. पर्यावरण संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘गो ग्रीन गडहिंग्लज’ या उपक्रमात विविध सेवाभावी संस्था, संघटना उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या आहेत.गोवा आणि कोकणचे प्रवेशद्वार आणि कोल्हापूर जिल्ह्याची दक्षिण राजधानी म्हणून गडहिंग्लजकडे पाहिले जाते. ‘शांतताप्रियनगरी’ हेच या गावचे वैशिष्ट्य आहे. वाढत्या नागरीकरणातून नगरपालिका अस्तित्वात आली तरी शहराने गावपणाची बाज आजही अबाधित राखली आहे. त्यामुळेच ‘राजकारण’ निवडणुकीपुरतेच मर्यादित ठेवून विविध सामाजिक उपक्रमांत गडहिंग्लजकर नेहमीच हिरिरीने भाग घेतात, याचा प्रत्यय कित्येकवेळा आला आहे.‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा फतवा शासनाकडून येण्यापूर्वीच येथील पालिकेने नागरिकांच्या सहकार्याने वृक्षलागवडीचा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे जोपासला आहे. त्यामुळेच पालिकेला ‘राज्याचा वनश्री’ पुरस्कार मिळाला आहे. संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानातही राज्यस्तरावर धडक मारली आहे. हागणदारीमुक्तीबद्दल एक कोटीचे अनुदानही पालिकेला नुकतेच मिळाले आहे. तथापि, वाहनांची वाढती संख्या आणि पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे शहरातील मुख्य रस्ता व बाजारपेठेत नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे अनेकदा लहान-मोठे अपघात होतात. प्रसंगी जीवितहानीदेखील होते. त्यावर उपाय म्हणूनच सायकल वापरण्याचा निर्णय गडहिंग्लजकरांनी घेतला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होण्याबरोबरच नागरिकांना शारीरिक तंदुरुस्ती आणि सुरक्षित वाहतुकीचा फायदा होणार आहे. त्यातूनच निसर्गाचे व पर्यावरणाचेही संरक्षण होण्यास मदत होणार आहे.सहभागी झालेल्या संस्थालायन्स क्लब, रोटरी क्लब, युनिव्हर्सल फ्रें डस् सर्कल, केदारी रेडेकर फौंडेशन, हिरण्यकेशी फौंडेशन, सह्याद्री अ‍ॅडव्हेंचर्स, प्रोग्रेसिव्ह ग्रुप, राजर्षी शाहू सामाजिक सेवा संस्था, गडहिंग्लज चेंबर आॅफ कॉमर्स, वृक्षमित्र व पर्यावरणप्रेमी संघटना, तरुण व महिला मंडळे.सायकल का वापरायची?व्यायाम, प्रदूषण टाळणे, इंधन व पैशाची बचत, वाहतुकीची कोंडी दूर होणे, अपघात टाळणे, दीर्घायुष्य, यासाठी सायकल वापरणे आवश्यक आहे.आवाहन सदस्यत्वासाठीशाळा, कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, उद्योजक, शासकीय अधिकारी आणि अन्य अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी नियमित, आठवड्यातून व महिन्यातून सातत्याने सायकल वापरून या क्लबचे सदस्य व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.