शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

संपावर गेल्यास तीन कोटी ६० लाखांचा पगार कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:02 IST

रमेश पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबा बावडा : युनायटेड फोरम्स बॅँक युनियनने ३० व ३१ मे रोजी पुकारलेल्या संपात कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याने त्यांचा पुढील महिन्यात दोन दिवसांचा पगार कापला जाणार आहे. पगार कापण्यात येणारी रक्कम सुमारे तीन कोटी ६० लाख रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.बॅँकेच्या ...

रमेश पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबा बावडा : युनायटेड फोरम्स बॅँक युनियनने ३० व ३१ मे रोजी पुकारलेल्या संपात कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याने त्यांचा पुढील महिन्यात दोन दिवसांचा पगार कापला जाणार आहे. पगार कापण्यात येणारी रक्कम सुमारे तीन कोटी ६० लाख रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.बॅँकेच्या क्लार्क, अधिकारी, शिपाई व वरिष्ठ अधिकारी यांचा महिन्याला सरासरी ६० हजारांच्या घरात पगार आहे. म्हणजेच प्रत्येक दिवशी दोन हजार रुपये सरासरी पगार पडतो. दोन दिवस संपावर गेल्यास प्रत्येकी चार हजार रुपयांची कपात होणार आहे. ही सर्व रक्कम मिळून तीन कोटी ६० लाख इतकी होते. जून महिन्याच्या पगारातून ही रक्कम कापली जाणार आहे.बॅँकांचा पगार हा प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी होतो. मे महिन्याचा पगार झाल्यानंतर हा संप होत आहे. त्यामुळे पगाराची रक्कम जूनमध्ये कापण्यात येणार आहे. प्रत्येक संपावेळी पगार रक्कम कापली जाते. मात्र पगार कापला जातो म्हणून कोणीही कर्मचारी संप करण्याचे टाळत नाहीत. संप केल्यावर पगार कपात होणार हे गृहीत धरूनच संप केला जातो. संपूर्ण देशभरातील कर्मचारी या संपात उतरले असून त्या सर्वांचा पगार कापला जाणार आहे.इंडियन बॅँक्स असोसिएशनतर्फे वेतन करारास विलंब होत असल्यामुळे या संपाची हाक देण्यात आली आहे. या संपात देशभरातील सुमारे १० लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत. १ नोव्हेंबर २०१७ पासून नवीन वेतनवाढ लागू होणे अपेक्षित होते. मात्र वेतन करारास सात महिन्यांहून अधिक उशीर झाल्याने व इंडियन बॅँक्स असोसिएशनच्या उदासीनतेमुळे बॅँक कर्मचारी व अधिकारी यांना संपावर जावे लागत असल्याचे संघटनांचे मत आहे.कोल्हापुरात ३० व ३१ मे रोजी बॅँक कर्मचारी संघटना स्टेट बॅँकेच्या व बॅँक आॅफ इंडियाच्या लक्ष्मीपुरी शाखेच्या दारात निदर्शने करणार आहेत. या संपामुळे कोट्यवधी रुपयांचा व्यवहार ठप्प होणार आहे. या काळात एटीएमच्या व्यवहारात वाढ होऊ शकते.