शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरातून किसन काटकर : इचलकरंजीतून बी. जी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 16:12 IST

बळीराज पार्टी व बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने लोकसभा निवडणूकीसाठी १६ उमेदवारांची घोषणा सोमवारी पक्षाचे महासचिव दिंगबर लोहार यांनी केली. कोल्हापूरमधून किसन काटकर तर इचलकरंजीतून बी. जी. पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती लोहार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे‘बळीराजा’ पक्षाचे १६ उमेदवार जाहीरकोल्हापूरातून किसन काटकर : इचलकरंजीतून बी. जी. पाटील

कोल्हापूर : बळीराज पार्टी व बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने लोकसभा निवडणूकीसाठी १६ उमेदवारांची घोषणा सोमवारी पक्षाचे महासचिव दिंगबर लोहार यांनी केली. कोल्हापूरमधून किसन काटकर तर इचलकरंजीतून बी. जी. पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती लोहार यांनी पत्रकार परिषदेत दिली.लोहार म्हणाले, केंद्रातील सरकारच्या कारभाराने सामान्य जनता त्रस्त असून त्यांना आधार देणारे उमेदवार व पक्षांची गरज आहे. बळीराजा पार्टीची संकल्पनाच कष्टकरी जनतेला बळ देण्याची असून त्यातूनच लोकसभा निवडणूकीला सामोरे जात आहे. बळीराजा शेतकरी संघटनेसह इतर छोटे छोटे पक्षांना सोबत घेण्याचा निर्णण रविवारी रात्री पुण्यातील बैठकीत झाला. त्यातूनच सोळा उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.

‘बळीराजा’ पार्टीचे उमेदवार असे, कंसात मतदारसंघ, किसन काटकर (कोल्हापूर), बी. जी. काका पाटील (हातकणंगले), पंजाबराव पाटील (सातारा), संजय पाटील (माढा), गणेश काका जगताप (बारामती), मोहन घारे (शिरूर), संभाजी गुणहाट (मावळ), पवन हिरे (शिर्डी), संजय पाशीलकर (रायगड), अरूण कनोरे (मुंबई उत्तर पुर्व), खुशबू बेलेकर (नागपूर), अ‍ॅड. शिला ढगे (वर्धा), नंद नरोटे (गडचिरोली), डॉ. धनंजय नालट (अकोला), संजय देशमुख (बुलढाणा), संजय टेंबरे (भंडारा-गोंदिया). याशिवाय बिहार, झारखंड, मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यात पक्ष निवडणूक लढविणार असल्याचे लोहार यांनी सांगितले. यावेळी यशवंत महाडिक, शिवाजीराव माळकर, एकनाथ रसाळ, दत्तात्रय सुतार, रणजीत गुरव, भैय्या वाघमारे आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapurकोल्हापूर