शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

३00 एकर क्षेत्रातील पिके करपू लागली

By admin | Updated: May 13, 2017 00:55 IST

३00 एकर क्षेत्रातील पिके करपू लागली

लोकमत न्यूज नेटवर्कहुपरी : तळंदगे (ता. हातकणंगले) येथील आठ दिवसांपूर्वी जळालेल्या विद्युत ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती करण्यास महावितरणकडून दिरंगाई होत आहे. परिणामी, ऐन उन्हाळ्यामध्ये शेतीला वेळेत पाणीपुरवठा होत नसल्याने सुमारे ३00 एकर क्षेत्रातील उभी पिके करपू लागली आहेत. याप्रश्नी संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या हुपरी उपविभागीय कार्यालयाकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता महावितरणकडे ट्रान्स्फॉर्मरच शिल्लक नसल्याचे उत्तर देऊन परत पाठविण्यात येत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकल्याने याप्रश्नी आता कुणाकडे दाद मागायची? या विवंचनेने शेतकरी वैतागून गेला आहे.तळंदगे येथील शिरोळे परिसरातील शेतीसाठी पाणीपुरवठा करणे सोईस्कर व्हावे यासाठी उभारण्यात आलेला विद्युत ट्रान्स्फॉर्मर आठ दिवसांपूर्वी जळाला आहे. त्यावेळेपासून शेती विभागाचा विद्युतपुरवठा पूर्णपणे बंद पडला आहे. याबाबत महावितरणचे उपअभियंता धुळुगडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, महावितरणकडे पर्यायी ट्रान्स्फॉर्मर उपलब्ध नसल्याने अद्यापपर्यंत त्या परिसरातील शेतीचा विद्युतपुरवठा गेल्या सात-आठ दिवसांपासून बंद आहे. येत्या दोन-तीन दिवसांत महावितरणकडून ट्रान्स्फॉर्मर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर परिसरातील शेतीचा विद्युतपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येईल.