निपाणी : कर्नाटक शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर निपाणी शहरात ग्रामीण भागातील व शहरातील नागरिकांची गर्दी होत आहे. या गर्दीत मास्क वापराकडे दुर्लक्ष होत असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. कोरोना गेलेला नाही याचे भान ठेवत प्रत्येक नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने जाहीर केलेला लॉकडाऊन सोमवारपासून शिथिल केला. काही अशी निर्बंध असले तरी खरेदीसाठी नागरिकांना मुभा देण्यात आली आहे. सर्व प्रकारची दुकाने सकाळी ६ ते सायंकाळी ५ पर्यंत उघडी आहेत. यामुळे या दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी नागरिक शहरात गर्दी करतात. प्रत्येक दुकानाच्या बाहेर गर्दी होत असून या गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे ही गर्दी कोरोनाला निमंत्रण देणारी ठरेल की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. लोकांच्या व्यक्त होत आहे.
निपाणी शहर हे चिकोडी, संकेश्वर, गडिंग्लज, कागल आदी भागातील नागरिकांसाठी एक मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. केवळ निपाणीच नव्हे तर संकेश्वर, चिकोडी तालुक्यातील भाजीपाला विक्रेते निपाणी शहरात विक्रीसाठी येत असतात. यामुळे निपाणीवर नेहमीच गर्दीचा बोजा पडत असतो. पण सध्याच्या परिस्थितीत गर्दी टाळणे महत्त्वाचे आहे. येत्या चार दिवसात वटपाैर्णिमा व कर्नाटकी बेंदूर असे दोन सण असल्याने या सणाच्या पार्श्वभूमीवर गर्दीसाठी खरेदीसाठी गर्दी होत आहे.
२२ निपाणी गर्दी फोटो
फोटो
निपाणी : शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून कोरोना वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.