शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरांत भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 14:40 IST

भगवान शंकराच्या आराधनेतील महत्त्वाचा दिवस असलेली महाशिवरात्री आज, शुक्रवारी सर्वत्र साजरी होत आहे. यानिमित्त शहरातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची शिवदर्शनासाठी गर्दी झाली होती.

ठळक मुद्देमहाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरांत भाविकांची गर्दी तालीम मंडळाच्या वतीने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कोल्हापूर : भगवान शंकराच्या आराधनेतील महत्त्वाचा दिवस असलेली महाशिवरात्री आज, शुक्रवारी सर्वत्र साजरी होत आहे. यानिमित्त शहरातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची शिवदर्शनासाठी गर्दी झाली होती.श्री शिवशंकराच्या आराधनेत सोमवार, श्रावण सोमवार हे दिवस महत्त्वाचे मानले जातात. मात्र या सगळ्यांत महाशिवरात्री या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वर्षभर एकही उपवास न करणाऱ्या व्यक्तीदेखील महाशिवरात्रीला व्रतस्थ राहतात. मध्यरात्री बारा वाजेपर्यंत देवाची उपासना केली जाते. कोल्हापूर हे शिवशक्तीचे स्थान मानले जाते; त्यामुळेच येथे शिवमंदिरांची संख्यादेखील जास्त आहे.शिवाजी पेठेतील चंद्रेश्वर गल्लीतील शिवमंदिरातही विशेष पूजा बांधण्यात आली. फुलांनी सजविलेल्या श्रींच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला. ही पूजा प्रथमेश सरनाईक, शुभम साळुंखे, रोशन जोशी, उमेश जाधव यांनी बांधली.गंगावेशेतील ऋणमुक्तेश्वर मंदिर तालीम मंडळाच्या वतीने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे श्रींच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर विशेष पूजा बांधण्यात आली.

निवृत्ती चौक येथील निवृत्ती तरुण मंडळाच्या वतीनेही उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी साडेसात वाजता श्री ब्रह्मेश्वरास लघुरुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर भाविकांना दूध, खिचडी व केळ्यांचे वाटप करण्यात आले. दिवसभरात चित्रकला, निबंध, संगीत खुर्ची, वक्तृत्व, वेशभूषा, नृत्य अशा विविध स्पर्धा होतील.मंगळवार पेठेतील रावणेश्वर मंदिरालाही आकर्षक सजावट करण्यात आली आहे. याशिवाय कैलासगडची स्वारी मंदिर, अंबाबाई मंदिर परिसरातील अतिबलेश्वर, वटेश्वर, कपिलेश्वर, उत्तरेश्वर या शिवमंदिरांमध्येही धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीkolhapurकोल्हापूर