शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

दौलतनगरात उमेदवारीसाठी ‘भाऊ’चीच गर्दी

By admin | Updated: September 6, 2015 23:40 IST

मातब्बर रिंगणात : संभाव्य उमेदवारांमध्ये अटीतटीच्या लढतीची शक्यता

प्रदीप शिंदे -- कोल्हापूर  सर्वसामान्य लोकांचा प्रभाग म्हणून दौलतनगर प्रभाग (क्र. ४०) ओळखला जातो. यंदा हा प्रभाग सर्वसाधारण खुला झाल्याने अनेक मातब्बर येथे आपले नशीब अजमावणार आहेत. यामध्ये माजी उपमहापौर विलास वास्कर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील, विद्यमान नगरसेविका संगीता देवकर हे निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे प्रभागात मोठी चुरस निर्माण झाली आहे. दौलतनगर प्रभागातील माजी उपमहापौर विलास वास्कर हे पुन्हा येथून निवडणूक लढणार आहे. वास्कर यांनी २००५ ते २०१० मध्ये प्रभागाचे नेतृत्व करताना अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा धडाका लावला होता. त्यांच्या कारकिर्दीमध्ये प्रभागाला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानातील दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीसही प्रभागाला मिळाले होते. सध्या आमदार अमल महाडिक यांच्या विशेष निधीद्वारे त्यांनी या ठिकाणी विकासकामांची सुरुवात केली आहे. गेल्या पाच वर्षांत कोणतेही पद नसतानासुद्धा त्यांनी प्रभागात संपर्क ठेवल्याने ती त्यांची जमेची बाजू आहे. सध्या ते भाजप-ताराराणी आघाडीकडून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष नितीन पाटील हे यंदा प्रथमच या प्रभागातून निवडणूक लढविणार आहेत. नितीन पाटील यांच्याकडे प्रभागातील युवा नेतृत्व म्हणून पाहिले जाते. प्रभागातील प्रश्नासाठी वेळोवेळी त्यांनी अनेक आंदोलने करून प्रश्न मार्गी लावले आहेत. मॅरेथॉन स्पर्धा, बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करून त्यांनी युवकांच्या क्रीडागुणांना वाव दिला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून प्रभागातील विधवा, मोलकरणी, ज्येष्ठ नागरिक, बांधकाम कामगार यांच्यापर्यंत त्यांनी विविध शासकीय योजना पाटील घरोघरी पोहोचविल्या आहेत. विद्यमान नगरसेविका संगीता देवकर यासुद्धा माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्याच्या तयारी आहेत. देवकर यांनी प्रभागात सुमारे चार कोटींची विकासकामे केली आहेत. अजूनही काही प्रश्न प्रलंबित आहेत, ते सोडवण्यासाठी निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमोल देशिंगकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. देशिंगकर यांना प्रभागात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते. कोणतेही पद नसताना त्यांनी प्रभागातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, रक्तदान शिबिर, आरोग्यासाठी आर्थिक मदत केली आहे. ते नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे आहेत व प्रभागात प्रामुख्याने डवरी समाजाचे साधारणपणे पाचशे मतदान आहे, ही त्यांची जमेची बाजू आहे. प्रभागातील ज्येष्ठ नेतृत्व म्हणून सुरेश माने यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या तीस वर्षांपासून माने हे सामाजिक कार्याच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचले आहेत. येथील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. तसेच ते माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. सध्या ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. दौलतनगर शिवसेनेचे शाखाप्रमुख सुनील यळगूडकर निवडणुकीच्या रिंंगणात उतरणार आहेत. प्रभागात त्यांनी मोफत वाचनालय सुरू केले आहे. नागरिकांना नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असतो. प्रभागाचा अभ्यास व जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांचे भाचे संताजी घोरपडे हेसुद्धा या प्रभागातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. आपल्या संताजी घोरपडे यूथ फौंडेशन माध्यमातून त्यांची युवकांशी नाळ जोडल्याने युवकांमध्ये ते लोकप्रिय आहेत. अनेक गरीब व गरजूंच्या उपचारांसाठी त्यांनी सीपीआर व खासगी रुग्णालयांसाठी अनेक वेळेला मदत केली आहे. एक उच्चशिक्षित व अभ्यासू उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याने त्यांच्याही पाठीशी मोठा जनसुमदाय आहे. यांच्यासह विद्यमान नगरसेविका संगीता देवकर यांचे दीर अनिल देवेकर काँग्रेस पक्षाकडून, माजी नगरसेवक कै. रामचंद्र चव्हाण यांचे पुत्र शिवराज ऊर्फ शंभू चव्हाण हे शिवसेनेकडून इच्छूक आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून नागेश जाधव हे इच्छुक आहेत. तसेच संतोष लोखंडे, उदय धोंगडे, गणेश निऊंगरे यांच्यासह अनेकजण या प्रभागातून निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत.असा आहे प्रभाग दौलतनगर, दौलतनगर झोपडपट्टी, तीनबत्ती चौक परिसर, भगतसिंग मित्रमंडळ, जागृतीनगर आदी परिसर. प्रभागात नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे जवळपास ५०० मतदान आहे. प्रभागात गरीब, कष्टकरी मतदारांची मोठी संख्या असून झोपडपट्टी आणि परिसरातील मतदान निर्णायक ठरते. प्रभाग खुला झाल्याने प्रत्येक पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे उमेदवार निवडताना नेत्यांचा कस लागणार हे निश्चित...असा असावा नगरसेवकनगरसेवक हा तरुणच असावा की ज्येष्ठ असावा याबाबतीत वाद करण्यापेक्षा नगरसेवक हा सामान्यापैकी एक असावा, जो काही असामान्य काम करून जनतेचा विश्वास संपादन करू शकेल. कारण नेता होण्यापेक्षा महत्त्वाचा असतो जनतेचा आपल्यावरील विश्वास. तो टिकून राहिला की, स्वत:बरोबरच आपल्या प्रभागाचा आणि पर्यायानं शहराचं यश खऱ्या अर्थाने पुढे येईल. रंजित पोकरनेकर, कोल्हापूर‘नेता’ या शब्दातच अर्थ दडलाय. ‘नेतृत्वाचं तारुण्य’. ज्याच्या अंगी जनतेच्या हिताची नेतृत्व करण्याची धमक आहे आणि तो विचाराने, मनाने तरुण आहे असाच सुशिक्षित नागरिक ‘नेता’ होण्यासाठी पात्र असतो, असं माझं मत आहे. समाजसुधारणेचा निर्धार मनात राखून तसं झगडणारं व्यक्तिमत्त्व नगरसेवक म्हणून आम्हाला हवा आहे. कल्पक योजना आखून अनेक गोष्टी साध्य करणारा नगरसेवक असावा. पूजा पाटील, साने गुरुजी वसाहत‘भ्रष्टाचार’ या गोष्टीचा उगम कोठूनही झाला असला तरी निवडणुकीच्या रिंगणात त्याला चांगलाच जोर धरला जातो आणि म्हणूनच निदान येत्या रणधुमाळीपासून ही भ्रष्टाचाराची कीड नामशेष व्हावी, ही मनोमन इच्छा आहे. निवडून येणारा उमेदवार भ्रष्टाचारास आळा घालणारा असावा. त्याचप्रमाणे पैशापेक्षा माणूस जपणारा आणि जमिनीवरच पाय असणारा असावा. आपल्या भागातल्या समस्या न सांगता त्याने सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अपूर्वा वाणी, कोल्हापूरनिवडणूक लढवताना तरुण मनाचा विचार करायला हवा. म्हणूनच नगरसेवक हा तरुणच असावा. भविष्याच्या आशेने मनगटातली आपली ताकद दाखवण्याची संधी शोधतोय. अशा तरुणांना आतातरी बळ देण्याचे, त्यांच्या हाती नेतृत्व देण्याचे किंवा त्यांच्या विचारांसोबत चालणारा एक सच्चा दोस्त नगरसेवक म्हणून हवा आहे. विशाल मुसळे, कोल्हापूरग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना स्वयंरोजगार, बचत गटाच्या वस्तंूना बाजारपेठ देण्यासारखे काम महिला चांगल्या पद्धतीने करू शकतात. त्यामुळे नगरसेवक ही एक महिलाच असावी आणि ती अशीच असावी. महिलांना मिळालेल्या सवलती, आरक्षणाचा इतरांना लाभ मिळवून देणारी एक निर्भीड, प्रामाणिक स्त्री नगरसेवक म्हणून हवी आहे. सायली सुमंत पाटील, ताराबाई पार्क