शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सरूडच्या धरणग्रस्त वसाहतीत मगरीचा शिरकाव; शिताफीने जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:26 IST

सरूड (ता. शाहूवाडी) येथील ऐतिहासीक गावतलावाजवळ धरणग्रस्त वसाहतीमध्ये नागरी वस्तीत मगरीने शिरकाव केल्याने शनिवारी रात्री एकच खळबळ उडाली. रात्री साडेदहाच्या सुमारास सुमारे सव्वा सहा फुट लांबीची साधारण अडीच वर्ष वयाच्या या मगरीला स्थानिक गोसावी समाजातील तरुणांनी शिताफीने जेरबंद करुन वन विभागाचा ताब्यात दिले. भर वस्तीत अपरात्री आलेल्या या मगरीमुळे परिसरातील नागरिकांची गाळण उडाली.

ठळक मुद्देसरूडच्या धरणग्रस्त वसाहतीत मगरीचा शिरकाव शिताफीने जेरबंद, वन विभागाचा दिले ताब्यात

सरूड : सरूड (ता. शाहूवाडी) येथील ऐतिहासीक गावतलावाजवळ धरणग्रस्त वसाहतीमध्ये नागरी वस्तीत मगरीने शिरकाव केल्याने शनिवारी रात्री एकच खळबळ उडाली. रात्री साडेदहाच्या सुमारास सुमारे सव्वा सहा फुट लांबीची साधारण अडीच वर्ष वयाच्या या मगरीला स्थानिक गोसावी समाजातील तरुणांनी शिताफीने जेरबंद करुन वन विभागाचा ताब्यात दिले. भर वस्तीत अपरात्री आलेल्या या मगरीमुळे परिसरातील नागरिकांची गाळण उडाली.याबाबत अधिक माहीती अशी, गेल्या काही वषार्पासुन सरुडच्या ऐतिहासीक गाव तलावात मागरींचा वावर असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते. यासाठी बंदोबस्त करण्याची ग्रामस्थानी स्थानिक प्रशासन व वन विभागाकडे मागणीही केली होती. या मागणीकडे दुर्लक्ष होत राहिले. शनिवारी रात्री पावसाची रिपरिप सुरु असताना रात्री साडेदहाच्या सुमारास ही मगर तलावा शेजारी असणाऱ्या नवीन वसाहतीमधील नागरी वस्तीत शिरली.

रात्रीची वेळ असल्याने सुरवातीस ही मगर स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली नाही. परंतु वसाहतीमधील साधु घोलप व दत्ता पाटील हे घराबाहेर आले असता त्यांच्या बँटरीच्या उजेडात सदर मगर त्यांच्या राहत्या घराशेजारील रस्त्याच्या कडेला दिसून आली. त्यानंतर त्यांनी त्वरीत स्थानिक तरुणानां बोलविले. यावेळी संपत जाधव, सुनिल सुतार, सागर जाधव, नितेश देसाई, नितीन डंबे, नितीन यादव, दिपक कांबळे, दत्ता पाटील, रणजीत कांबळे, अरुण घोलप, अमोल पाटील, विश्वजीत खोत आदी तरूणांनी मोठ्या धाडसाने तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर मगरीला सुखरूप जेरबंद केले.

पोलिस पाटील दिपाली घोलप यांनी दिली वन विभागाच्या कर्मचां-याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत या घटनेची माहीती दिली. दरम्यान रात्री दिडच्या सुमारास मलकापूर वनविभागातील वनपाल रशिद गारदी, वन कर्मचारी शंकर लव्हटे, सुरज पाटील, अमर शिंदे आदींचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानी मगरीस आपल्या ताब्यात घेऊन मलकापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांच्या सुचनेनसार रविवारी पहाटे अज्ञात परंतु सुरक्षित ठिकाणी सोडून दिले.

 

टॅग्स :forest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर