शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

‘झूम’साठी कोटीची सुपारी

By admin | Updated: June 17, 2015 01:05 IST

व्याप्ती कमी करण्याचा प्रयत्न : पालिका सभेत ४० विषयांवर होणार चर्चा

कोल्हापूर : महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. १९) होत आहे. या सभेपुढे आरक्षणात बदल, झोन बदल, मुदतवाढ, आदी ‘आंब्यां’च्या विषयासह रुग्णालयासाठी असलेल्या १३ कलमी फायर अ‍ॅक्टच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा होणार आहे. लाईन बझार येथील झूम कचरा प्रकल्प हटविण्याच्या नागरिकांच्या मूळ मागणीकडे दुर्लक्ष करीत बफर झोनची व्याप्ती ४०० मीटरने कमी करण्याचा ठराव घुसडण्यात आला आहे. यासाठी तब्बल कोटी रुपयांची सुपारी फुटल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.गोविंद पानसरे यांच्या स्मारकासाठी वि. स. खांडेकर प्रशालेच्या दक्षिण बाजूकडील जागा मंजूर केली आहे. स्थानिक नागरिकांचा विरोध डावलून राजारामपुरीतील शाळा क्रमांक ९च्या मैदानावर ‘मराठा भवन’ होण्यासाठी आरक्षित करण्याचा प्रस्ताव सभेपुढे ठेवला आहे. शहरातील तब्बल ३५० हून रुग्णालये केंद्र शासनाने ठरवलेल्या अग्निप्रतिबंधक नियमांचे पालन करू शकत नाहीत. परिणामी या रुग्णालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण न झाल्याने रुग्णांना विमा सेवा मिळण्यात अडचणी आहेत. या रुग्णालयांवरही टांगती तलवार आहे. अग्निप्रतिबंधक नियमामध्ये शिथिलता देण्याबाबत सभेत चर्चा होणार आहे. कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण व्हावे, यासाठी नागरिकांना सवलतीच्या दरात कचरा कुंड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मार्केट यार्ड येथे बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीसाठी आरक्षण टाकण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत मंजुरी घेतली जाणार आहे. महापालिकेच्या वापरात नसलेल्या तब्बल नऊहून अधिक शाळांच्या इमारतींंचा पीपीपी तत्त्वावर विकास करून त्या भाड्याने दिल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)बांधकाम व्यावसायिक ांचे हित सांभाळण्यासाठीच ठरावलाईन बझार येथे कचरा डेपो असलेल्या झूम प्रकल्पाशेजारील ५०० मीटरचा परिसर हा बफर झोन आहे. याची व्याप्ती कमी करून १०० मीटरवर आणण्याचा नगरसेवकांचा विचार आहे. झूम प्रकल्पाभोवतालच्या जमिनीचा भाव ३० लाख रुपये गुंठा याप्रमाणे सुरू आहे. आरोग्यास घातक ठरत असलेला हा प्रकल्प येथून हटविण्याची नागरिकांची मागणी आहे. याबाबत चर्चा किंवा निर्णय न घेता बफर झोनची व्याप्ती कमी करण्याचा ठराव सभेपुढे आणला आहे. परिसरातील जागेवर असणारा डोळा व बांधकाम व्यावसायिक ांचे हित सांभाळण्यासाठीच हा ठराव संमत करण्याची घाई सुरू आहे. हा ठराव संमत करून त्याचा अंमल करण्यासाठी तब्बल कोटी रुपयांची सुपारी फुटल्याची चर्चा महापालिकेत आहे.