शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

हिरण्यकेशी प्रदूषित करणाऱ्यांवर फौजदारी करा

By admin | Updated: April 30, 2015 00:31 IST

गडहिंग्लज पंचायत समिती सभा : बाळेश नाईक यांनी सभागृहाचे कामकाज रोखले

गडहिंग्लज : मळी मिश्रित पाणी व सांडपाणी हिरण्यकेशी नदीत सोडून पाणी प्रदूषित करणाऱ्या संकेश्वरच्या हिरण्यकेशी साखर कारखान्यावर व गडहिंग्लज नगरपालिकेवर फौजदारी करावी, अशी आग्रही मागणी विरोधी जनता दलाचे सदस्य बाळेश नाईक यांनी बुधवारी केली. याप्रश्नी आक्रमक भूमिका घेऊन त्यांनी काही काळ सभागृहाचे कामकाज रोखून धरले.सभापती अनुसया सुतार यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची मासिक सभा झाली. पाटबंधारे खात्याच्या आढावावेळी बाटलीतून आणलेले हिरण्यकेशीचे गढूळ पाणी सभापतींच्या टेबलावर ठेवून नाईक यांनी हा प्रश्न लावून धरला.नदीतील पाणी प्रदूषित करणाऱ्यांवर पाटबंधारे खाते काय कारवाई करणार ? याबाबत ठोस उत्तर मिळावे, अशी मागणी त्यांनी केली. संबंधित अधिकाऱ्यांकडून उत्तर मिळेपर्यंत कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. अ‍ॅड. हेमंत कोलेकर यांच्यासह उपस्थित सर्व महिला सदस्यांनीही त्यांच्या मागणीला दुजोरा दिला.सुरूवातीला पाटबंधारे खात्याचे अधिकारी सभेला उपस्थित नव्हते. या खात्याकडून आलेली टिप्पणी सभा कामकाज लिपिक राणे यांनी वाचून दाखवायला सुरूवात केली. त्यास नाईक यांनी जोरदार आक्षेप घेतला. गडहिंग्लज शहरासह पूर्वभागात पाणी प्रदूषणाचा विषय गाजत आहेत. याप्रश्नी आंदोलन सुरू असतानाही पाटबंधारे खात्याला त्याचे गांभीर्य नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी सभागृहात उपस्थित राहून उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.सभापती सुतार व सहायक गटविकास अधिकारी पी. बी. जगदाळे यांनी भ्रमनध्वनीवरून पाटबंधारे शाखा अभियंता नाडकर्णी यांना बोलावून घेतले. जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीस गेल्यामुळे या सभेला उपस्थित राहण्यास विलंब झाल्याचा खुलासा करून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतरच कामकाजाला सुरूवात झाली. नाडकणी यांच्यावरही नाईकांनी प्रश्नांचा भडिमार केला. त्यावेळी प्रदूषणाच्या प्रश्नावर कारवाईसाठी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ही स्वतंत्र यंत्रणा असून, कारवाईची बाब खात्याच्या कार्यकक्षेत येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तथापि, चित्रीच्या लाभक्षेत्रातील निलजी बंधाऱ्यापर्यंत कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी साठविण्यात आले आहे. याच नदीच्या पाण्यावर अनेक गावांच्या नळयोजना अवलंबून आहेत. नदीचे पाणीच प्रदूषित झाल्यामुळे पूर्वभागातील अनेक खेड्यातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून तेरणीच्या तलावातून पाणी उपसण्यास हलकर्णीसह आजूबाजूच्या ग्रामपंचायतींना परवानगी द्यावी, अशी मागणी नाईकांनी केली. त्यास नाडकर्णी यांनी सहमती दर्शविली.सभेस सदस्या मीना पाटील, स्नेहल गलगले, सरिता पाटील व रजनी नाईक यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)सभेनंतर नांगनूर बंधाऱ्याची संयुक्त पाहणीहिरण्यकेशी प्रदूषणाच्या प्रश्नावरील चर्चेत नाईक यांनी सभा संपल्यानंतर सभापती व संबंधित अधिकाऱ्यांनी नांगनूर बंधाऱ्याला भेट देण्याची मागणी केली होती. त्यानुसार सभापती सुतार व सहायक गटविकास अधिकारी जगदाळे, पाटबंधारे शाखाअभियंता नाडकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अथणी, पंचायत अधिकारी माळी यांनी नांगनूर बंधाऱ्याला भेट देऊन त्या परिसरातील हिरण्यकेशीच्या पाण्याची पाहणी केली.