शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

अपघात झाल्यास ठेकेदारावर फौजदारी गुन्हा, आयुक्तांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 10:40 IST

अमृत योजनेअंतर्गत शहरातील जलवाहिनी व ड्रेनेज लाईनच्या कामाबाबत महापौर निलोफर आजरेकर यांनी सोमवारी बैठकीत नाराजी व्यक्त करीत संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी सूचना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली. ज्या ठिकाणी खुदाई केलेली आहे ती कामे प्राधान्याने करुन घ्यावीत, अन्यथा काही दुर्घटना घडल्यास ठेकेदारास जबाबदार धरून फौजदारी दाखल केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.

ठळक मुद्देअपघात झाल्यास ठेकेदारावर फौजदारी गुन्हा, आयुक्तांचा आदेश महापौरांनी अमृतच्या ठेकेदारावर व्यक्त केली नाराजी

कोल्हापूर : अमृत योजनेअंतर्गत शहरातील जलवाहिनी व ड्रेनेज लाईनच्या कामाबाबत महापौर निलोफर आजरेकर यांनी सोमवारी बैठकीत नाराजी व्यक्त करीत संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी सूचना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली. ज्या ठिकाणी खुदाई केलेली आहे ती कामे प्राधान्याने करुन घ्यावीत, अन्यथा काही दुर्घटना घडल्यास ठेकेदारास जबाबदार धरून फौजदारी दाखल केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.ठेकेदाराला केलेल्या कामाचे रिस्टोलेशन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तेही काम कंपनीने पूर्ण केले नाही. लॉकडाऊनच्या काळात मुख्य रस्त्यावरील काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तेही काम लॉकडाऊन संपला तरी सुरू करण्यात आलेले नाही, याकडे महापौरांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.जलअभियंता भास्कर कुंभार यांनी अमृत योजनेचे काम शहरात फक्त चार ठिकाणी सुरू असून, ते काम प्रगतीपथावर असल्याचे दिसत नसल्याचे सांगितले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता डी. के. महाजन यांनी अमृत योजनेचे काम मंदगतीने सुरू असल्याचे सांगितले.

पावसाळ्यापूर्वी टाक्यांची कामे ग्राऊंड लेव्हलला आली असती तर पावसाळ्यात कामे करता आली असती. याबाबत कंपनीला वारंवार सृूचना दिलेल्या आहेत. कामाची मुदत ऑगस्टपर्यंत आहे. कामाची प्रगती २५ टक्के आहे. बैठकीला स्थानिक मॅनेजरऐवजी कंपनीच्या जबाबदार व्यक्तीस बोलावून त्यांच्याबरोबर चर्चा करावी, अशी स्पष्ट सूचना महाजन यांनी केली.आयुक्त कलशेट्टी यांनी कामाचा प्राधान्यक्रम ठरवून पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करावीत, अशा सूचना ठेकेदाराच्या प्रतिनिधीला केल्या. ठेकेदार असिस्टंट मॅनेजर संजय जोशी यांनी चार दिवसांत लेबर येत असून कामाची गती वाढवू, असे सांगितले.यावेळी स्थायी सभापती संदीप कवाळे, अशोक जाधव, राहुल चव्हाण, प्राधिकरणाचे उपअभियंता अजय साळोखे, एस. व्ही. जानवेकर, उपजल अभियंता रामदास गायकवाड, राजेंद्र हुजरे, एन. एस. सुरवसे, कनिष्ठ अभिंतया संजय नागरगोजे, नोबेल कन्ट्रक्शनचे कनिष्ठ अभियंता सुशील पाटील उपस्थित होते.

 

  • ११४ कि.मी. पैकी ५४ कि.मी.जलवाहिनीचे काम पूर्ण
  • ५४ कि. मी. पैकी ४७ कि.मी. ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण .
  •  बारा टाक्यांपैकी दोन टाक्यांचे काम सुरू.
टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर