शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात ४८ संस्थांत ७५ कोटींचा अपहार तीनशेहून अधिक जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 00:42 IST

‘सहकार पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत ४८ सहकारी संस्थांमध्ये तब्बल ७५ कोटींचा अपहार झाला आहे.

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : ‘सहकार पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत ४८ सहकारी संस्थांमध्ये तब्बल ७५ कोटींचा अपहार झाला आहे. यामध्ये बॅँका, पतसंस्था व विकाससंस्थांची संख्या लक्षणीय असून, या संस्थांशी संलग्न ३०० हून अधिक जणांवर पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत. लेखापरीक्षकांकडून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले; पण वसुलीची प्रक्रिया कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे.

यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांनी सहकाराची चळवळ राज्यात बळकट केली; पण खºया अर्थाने कोल्हापुरातील कर्तृत्ववान नेतृत्वामुळे येथे सहकार रुजला आणि फोफावलाही. सहकारामुळे विशेषत: साखर कारखाना, दूध संघ, विकास संस्था, पतसंस्थांमुळे जिल्ह्याचे अर्थकारण भक्कम झाले. ग्रामीण भागातील सामान्य माणसाला उभे करण्याचे काम सहकाराने केले, हे कोणीही नाकारू शकत नाही; पण सहकारात ‘स्वाहा’कार घुसल्याने अनेक वित्तीय संस्था डबघाईला आल्या. अपहारामुळे संस्था अडचणीत आल्या.

लेखापरीक्षणात अपहार उघडकीस आल्यानंतर लेखापरीक्षकांनी तत्काळ निबंधकांची मान्यता घेऊन गुन्हा नोंद करायचा असतो; पण अनेकवेळा लेखापरीक्षकच गुन्हे नोंद करण्यास टाळाटाळ करतात. एस. के. पाटील बॅँकेच्या बाबतीत असेच घडले. अपहार स्पष्ट झाला; पण संचालकांवर कारवाई करण्याबाबत लेखापरीक्षकांनी कानाडोळा केला. ठेवीदार संस्थांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल झाले.

गेल्या पाच वर्षांत शंभरहून अधिक संस्थांमध्ये आर्थिक घोटाळे झाले; पण त्यांतील अपहाराची रक्कम न भरल्याने ४८ संस्थांच्या पदाधिकारी व कर्मचाºयांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या ४८ संस्थांमध्ये सर्वाधिक चार वेळा शेतकरी संघाच्या विविध शाखांमध्ये कर्मचाºयांनी अपहार केले आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. गडहिंग्लजच्या शिवाजी बॅँकेच्या संचालकांवर १३ कोटी ३१ लाखांच्या अपहाराबद्दल गुन्हे दाखल झाले आहेत. अलीकडेच एस. के. पाटील बॅँकेच्या संचालकांवर१७ कोटींच्या अपहाराबद्दल गुन्हे दाखल केले आहेत.मोठा अपहार आर्थिक गुन्हे अन्वेषणकडेतीन कोटींपर्यंत अपहार असेल तर संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करता येतात; पण त्यापेक्षा जास्त अपहार असेल तर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचा अभिप्राय घ्यावा लागतो.शेतकरी संघात सर्वाधिक अपहारगेल्या पाच वर्षांत शेतकरी संघाच्या चार शाखांत अपहार झालेले आहेत. ‘नर्सरी’, ‘टिंबर मार्केट’, ‘पडळ’ या शाखांत आतापर्यंत नऊ लाख ८५ हजारांचा अपहार झाला आहे.संबंधित कर्मचाºयांवर गुन्हेही दाखल झालेले आहेत.

पाच वर्षांतील अपहार झालेल्या संस्थांची संख्याप्रमुख संस्था (कंसात अपहाराची रक्कम )शेतकरी संघ नर्सरी शाखा (८२ हजार ६७५ रुपये),टिंबर मार्केट शाखा (३ लाख ५५ हजार)रत्नाप्पाण्णा कुंभार हौसिंग (६ लाख ९८ हजार)एस. के. पाटील बॅँक (१७ कोटी),साधना बॅँक, इचलकरंजी (११.५४ लाख),शेतकरी संघ पडळ शाखा (३.७८ लाख)शेतकरी संघ पडळ शाखा (१ लाख ६९ हजार)शिवाजी को-आॅप. बॅँक, गडहिंग्लज (१३ कोटी ३१ लाख) 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजी