कोल्हापूर : देशात कोठेही सर्व्हिस स्टेशन नसतानाही लॅपटॉप खरेदीवर एक वर्षाची वाॅरटी देऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका ऑनलाईन कंपनीच्या दोघांवर राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला. याबाबत संजय शिंदे (रा. राजारामपुरी) यांनी तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती, तक्रारदार शिंदे यांनी एका ऑनलाईन वस्तू विक्री करणाऱ्या कंपनीकडून दि. २८ डिसेंबर २०१९ रोजी लॅपटॉप खरेदी केला. संबंधित कंपनीने लॅपटॉपला एक वर्षाची वॉरंटी दिली. हा लॅपटॉप दि. ५ जानेवारी २०२० ला मिळाला. तो दि. १० मार्च २०२० रोजी बंद पडला. त्यांनी संबंधित ऑनलाईन कंपनीच्या लॅपटॉप बंद पडल्याचा ई-मेल पाठवून वॉरंटीची मागणी केली. त्यावेळी संबंधित कंपनीने सदर लॅपटॉप देशात तयार झालेला नाही. त्यामुळे त्याला सर्व्हिस सपोर्ट मिळत नसल्याचे सांगितले. त्यानुसार शिंदे यांनी संबंधित कंपनी प्रतिनिधी व अधिकृत विक्रेते यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली.