शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

युवतीवर अत्याचार, इंद्रजित पठाडे याच्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 13:17 IST

इंटेरियर डिझाईनचा कोर्स करणाऱ्या युवतीला पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण व मारहाण करून अत्याचार केल्याप्रकरणी संशयित इंद्रजित धनंजय पठाडे (वय २३, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर)याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात एक मार्चला गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देयुवतीवर अत्याचार, इंद्रजित पठाडे याच्यावर गुन्हाअटकेची मागणी : गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित पसार

कोल्हापूर : इंटेरियर डिझाईनचा कोर्स करणाऱ्या युवतीला पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण व मारहाण करून अत्याचार केल्याप्रकरणी संशयित इंद्रजित धनंजय पठाडे (वय २३, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर)याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात एक मार्चला गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार झाला आहे. त्याने मोबाईल बंद ठेवल्याने लोकेशन मिळत नाही आहे. त्याने अपहरणासाठी वाहन व पिस्तुल कोणाचे वापरले, हे तो सापडल्यानंतर पुढे येणार आहे. दरम्यान संशयितास अटक करावी अशी मागणी ताराराणी महिला आघाडीच्यावतीने गृह पोलिस उपअधीक्षक सतिश माने यांच्याकडे सोमवारी करण्यात आली. यावेळी हेमा कुलकर्णी, सविता सरदार, लक्ष्मी हक्के आदी उपस्थित होत्या.पोलिसांनी सांगितले,‘इंगळेनगर येथे राहणाऱ्या पीडित युवतीची आणि संशयित इंद्रजित पठाडे याची फेसबुकवर ओळख झाली. त्यानंतर दोघेही मित्र झाले. संशयिताचा स्वभाव चांगला नसल्याचे समजल्यानंतर संबंधीत युवती त्याला टाळू लागली; परंतु त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्यावर वेळोवेळी जबरदस्तीने अत्याचार केला.

युवती एका उद्योजकांची मुलगी आहे. अत्याचार वाढू लागल्याने तिने या प्रकाराची माहिती आई-वडिलांना दिली. त्यांनी तिला धीर देत शाहूपुरी पोलिसांत तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच संशयित इंद्रजित पसार झाला. त्याने मोबाईलही बंद ठेवला आहे. या प्रकाराने पीडित युवतीसह तिच्या आई-वडिलांना मानसिक धक्का बसला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रिझवाना नदाफ करत आहेत.’

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर