याप्रकरणी दीपक मनोहर मुळीक असे गुन्हा नोंद झालेल्या सशंयिताचे नाव आहे. याबाबत फिर्याद ग्रामविकास अधिकारी अनिल भारमल यांनी दिली.
पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, पाडळी येथील मानेवाडी येथे गायरान गट नंबर ५३४ मध्ये २१४.३७ स्के. फूट क्षेत्रावर चिरा विटांचे पक्के बांधकाम सुरू होते. हे बांधकाम अतिक्रमण करून मुळीक हे करत होते. याबाबत ग्रामविकास अधिकारी भारमल यांनी विनापरवाना बांधकाम करू नये, अशी नोटीस बजावली होती. याकडे दुर्लक्ष करून ही बांधकाम सुरू असल्याने त्यांनी तलाठी, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष यांना घेऊन पंचनामा केला होता. यास दाद न देता बांधकाम काढून न टाकता सुरूच ठेवले म्हणून वडगाव पोलीस ठाण्यात भा.द.वि.स. कलम ४४७, ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ५३ नुसार तक्रार दिली.