पेठवडगाव : माहेरहून मोटारसायकलसाठी पैसे आणावेत यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासूच्या विरोधात वडगाव पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अश्विनी साजन सकट (वय २७, सध्या रा. पेठवडगाव) यांनी तक्रार दिली आहे. पती साजन सकट, सासू नागेश्वरी सकट (दोघे रा. विचारेमाळ, सदर बझार, पन्हाळकर गल्ली, कोल्हापूर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास साहाय्यक फौजदार दीपक पोळ करीत आहेत. पेठवडगाव येथील माहेर असणाऱ्या अश्विनी यांना सासरच्या मंडळींकडून विनाकारण घरगुती कारणावरून त्रास देत असत. तसेच उपाशी ठेवत असत. माहेरहून मोटारसायकल आणावी यासाठी यासाठी मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला, असे तक्रारीत म्हटले आहे.
.