शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

गावागावात जलसाठे निर्माण करणार  : सदाभाऊ खोत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 4:50 PM

कोल्हापूर : जलयुक्त शिवार अभियान हे राज्य शासनाचे प्राधान्यक्रमाचे अभियान असून ते यापुढेही अधिक प्रभावीपणे राबवून गावागावात जलसाठे निर्माण करुन गावे जलसमृध्द बनविण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन असल्याचे कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी येथे केले.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कळंबे तर्फ ठाणे (ता. करवीर) येथे राबविलेल्या जलसंधारणाच्या विविध प्रणालींची राज्याचे ...

ठळक मुद्दे ‘जलयुक्त शिवार’अंतर्गत कळंबे तर्फ ठाणे येथे पाणी पूजनशेतकºयांना ट्रॅक्टर व पॉवर टेलरचे वितरण शेतकºयांना ट्रॅक्टर व पॉवर टेलरचे वितरण शेतकºयांना ट्रॅक्टर व पॉवर टेलरचे वितरण कृषिविषयक योजना शेतकºयांच्या बांधापर्यंत प्रभावीपणे पोहोचवाउन्नत शेती -समृध्द शेतकरी मोहिम गतीमान करा

कोल्हापूर : जलयुक्त शिवार अभियान हे राज्य शासनाचे प्राधान्यक्रमाचे अभियान असून ते यापुढेही अधिक प्रभावीपणे राबवून गावागावात जलसाठे निर्माण करुन गावे जलसमृध्द बनविण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन असल्याचे कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी येथे केले.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कळंबे तर्फ ठाणे (ता. करवीर) येथे राबविलेल्या जलसंधारणाच्या विविध प्रणालींची राज्याचे कृषि राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी पाहणी करुन सिमेंट नालाबांधातील पाण्याचे पूजन केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अमल महाडीक, गोकुळ दुध संघाचे संचालक बाबा देसाई, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, कृषि सहसंचालक डॉ. नारायण शिसोदे आदि प्रमुख उपस्थित होते. यावेळी मंत्री खोत यांच्या हस्ते कृषि यांत्रिकीकरणातून शेतकºयांना ट्रॅक्टर व पॉवर टेलरचे वितरण करण्यात आले.कळंबे तर्फ ठाणे येथे कृषी विभागामार्फत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राबविलेल्या जलसंधारणाच्या विविध प्रणालींची पाहणी करुन मंत्री खोत यांनी समाधान व्यक्त केले. शेतकºयांसाठी शासन अनेकविध योजना आणि उपक्रम राबवित असून या कृषिविषयक योजना शेतकºयांच्या बांधापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे काम कृषि अधिकाºयांनी करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. कृषि विभागामार्फत उन्नत शेती -समृध्द शेतकरी ही मोहिमही शेतकºयांसाठी अतिशय उपयुक्त असून ही मोहिम कृषि विभागाने अधिक गतीमान करावी असेही त्यांनी सांगितले.जिल्हा अधिक्षक कृषिअधिकारी बसवराज मास्तोळी म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कळंबे तर्फ ठाणे येथे जलसंधारण प्रणालीची विविध १८ कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये शेततळी, सिमेंट नालाबांध खोलीकरण व रुंदीकरण, गाळ काढणे, सलग समतल चर, साखळी सिमेंट काँक्रीट नाला बांध खोलीकरण व रुंदीकरण, गाव तलावातील गाळ लोकसहभागातून काढणे, पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणाच्या कार्यक्रमांचा समावेश आहे.

यावेळी पाटबंधारे विभागाचे कायर्कारी अभियंता संग्राम पाटील, विभागीय अधिक्षक कृषि अधिकारी उमेश पाटील, कृषि विकास अधिकारी चंद्रकांत सुयर्वंशी, उपविभागीय कृषि अधिकारी रविंद्र पाठक यांच्यासह शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.