शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

विश्वकोश ज्ञानमंडळांच्या माध्यमातून नवी ज्ञानसंस्कृती निर्माण :  दिलीप करंबेळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 15:02 IST

मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हे ज्ञानमंडळांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्वतजणांना एकत्र करून नवी ज्ञानसंस्कृतीची निर्मिती करीत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी येथे केले.

ठळक मुद्देविश्वकोश ज्ञानमंडळांच्या माध्यमातून नवी ज्ञानसंस्कृती निर्माण :  करंबेळकरशिवाजी विद्यापीठातील कार्यशाळा

कोल्हापूर : मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हे ज्ञानमंडळांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्वतजणांना एकत्र करून नवी ज्ञानसंस्कृतीची निर्मिती करीत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी येथे केले.विश्वकोश निर्मिती मंडळ आणि शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित आधुनिक इतिहास ज्ञानमंडळाच्या नोंदलेखक कार्यशाळेत ते बोलत होते. विद्यापीठातील इतिहास अधिविभागामधील या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मानव्यशास्त्र विभागाच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील होत्या.

अध्यक्ष करंबेळकर म्हणाले, मातृभाषेतून मिळालेले ज्ञान परिवर्तनास पोषक असते; त्यामुळे इतिहास लेखकांनी तटस्थपणे नोंदलेखन करून ते पुढील पिढ्यांसाठी ज्ञानसंचित राहील, याची काळजी घ्यावी. डॉ. भारती पाटील म्हणाल्या, व्यक्तीची सामाजिक व राजकीय भूमिका इतिहासातून घडत असते, त्यासाठी निष्पक्ष इतिहास लेखन करावे.या कार्यक्रमात आधुनिक इतिहास ज्ञानमंडळाच्या फलकाचे अनावरण प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. विश्वकोश मंडळाचे सदस्य डॉ. अरुणचंद्र पाठक, विद्याव्यासंगी सहायक संपादक सरोजकुमार मिठारी यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, मराठी विभागाचे प्रमुख डॉ. राजन गवस, डॉ. नीलांबरी जगताप, उमाकांत खामकर उपस्थित होते. समन्वयक डॉ. अवनीश पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दत्तात्रय मचाले यांनी सूत्रसंचालन केले.

इतिहास विभागप्रमुख डॉ. नंदा पारेकर यांनी आभार मानले. दरम्यान, या कार्यशाळेत कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरीतील इतिहास अभ्यासक, लेखक सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर