शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

खणदाळच्या युवा गायकाचे कर्नाटकात कर्तृत्व

By admin | Updated: March 24, 2015 00:13 IST

अनेक स्पर्धा जिंकल्या : संगीताचा कसलाही वारसा नसताना अमित चौगुलेचे संगीत क्षेत्रात यश

संजय थोरात- नूल महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न केव्हा सुटणार आहे हे कुणालाच माहीत नाही. मात्र, महाराष्ट्रातील एका युवा गायक-संगीतकाराने कर्नाटक चित्रपट क्षेत्रात ठसा उमटवला आहे. त्याच्या गाण्यांना कर्नाटकातील सोशल मीडियात हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. अमित अशोक चौगुले (रा. खणदाळ, ता. गडहिंग्लज) असे या युवा गायक संगीतकाराचे नाव आहे.संगीताचा कसलाही वारसा नसताना अमितने जिद्द, मेहनतीच्या जोरावर आणि वडील अशोक यांच्या आर्थिक पाठबळावर संगीतक्षेत्रात स्थान मिळविले आहे. खणदाळ, हलकर्णीत त्याचे माध्यमिक, तर निडसोशी, बेळगावात त्याचे उच्च शिक्षण झाले. त्याने एमसीए संगणक अभियंत्याची पदवी घेतली आहे. ‘२०११ ला व्हाईस आॅफ गडहिंग्लज’ ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्याच्यातील खरा कलाकार जिवंत झाला. मग त्याने शरद कुर्डेकर यांच्याकडून गिटार हे वाद्य, तर स्वरसाधना संगीत विद्यालयात पंडित मच्छिंद्र बुवा यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे ज्ञान प्राप्त केले. कोल्हापूरच्या कॉर्डज् संगीत स्टुडिओत त्याला आवाजाबद्दल तांत्रिक ज्ञान मिळाले.अनुराग जिजस अकॅडमीने तयार केलेला ‘जिजस इज माय फे्रंड’ हा त्याचा पहिला आॅडिओ अल्बम प्रसिद्ध झाला. लंडनमध्ये या अल्बमच्या प्रती विकल्या गेल्या. ‘कार मुगिलू’ या कन्नड चित्रपटात त्याने स्वत:च्या आवाजात एक गाणे गायिले आहे. याच गाण्याच्या ‘टिझर’ने कर्नाटकातील सोशल मीडियावर युवकांमध्ये धुमाकूळ घातला आहे. टी.व्ही.नाईन, समया टी.व्ही.ने याची दखल घेतली आहे. सध्या हा चित्रपट अंतिम टप्प्यात आहे. अमितने स्वत: संगीतबद्ध करून गायलेला ‘ओ जिववे’ हा अल्बम एप्रिल - मे महिन्यांत रिलीज होतोय. कुंपण फेम चंद्रशेखर जानवाडे, हर्षद शिरगुप्पी, काडेश बस्तवाडे यांची गीते आहेत.वडील अशोक चौगुले स्वत: प्रोड्युसर आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, मल्याळी, तेलगू, तमिळ अशा विविध भाषांमध्ये तो गातो. सुमारे ६० ते ७० गाण्यांच्या चाली त्याने स्वत: घरी बसून तयार केल्या आहेत. घरातच त्याचे रेकॉर्डिंग साहित्य आहे. गिटार, की-बोर्ड, पियानो, हार्मोनिअम ही वाद्ये तो वाजवतो. आकाशवाणीवर त्याचे कार्यक्रम झाले आहेत. तो मिमीक्रीसुद्धा करतो. चित्रकलेत त्याचा हातखंडा आहे. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते त्याचा युवा गायक म्हणून सत्कार झाला. भौगोलिक व भाषेच्या सीमा पार करून या युवा कलाकाराने कर्नाटकात घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे.मराठी संगीतक्षेत्रात अमितने खूप मेहनत घेतली. मात्र, अनेकदा ‘तोंडचा घास’ हिरावून घेतला गेल्याने तो अपसेट झाला अन् कर्नाटकात स्थिरावला. मराठीत कोणी गॉडफादर नसल्याने मागे पडल्याची खंत त्याच्या मनात आहे.संगीतवेड्या तरुणाचे शिक्षणात लक्ष नव्हते. महाविद्यालयाने त्याला हकलवून लावले होते. मात्र, त्याच महाविद्यालयाने अमितचे कर्तृत्व पाहून पुन्हा बोलावून घेतले.