लाइफ विन्स फाउंडेशन मुंबई यांच्यावतीने दोन लाख रुपये किमतीचे साहित्य आरोग्य विभागासाठी देण्यात आले. सिद्धनेर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी, आशा सेविका, गावातील खासगी डॉक्टर, अंगणवाडी सेविका, स्वस्त धान्य दुकानातील सर्व कर्मचारी, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी, शिक्षक आधी क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तींचा कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक विजय कुरणे यांनी केले. या वेळी कॉम्रेड शिवाजी मगदूम, सरपंच दत्तात्रय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी सरपंच वाय. व्ही. पाटील, एम. बी. पाटील, सुभाष मगदूम, उपसरपंच मनोहर लोहार, धनाजी मगदूम, संदीप पाटील, केशव चौगुले, पोलीस पाटील उद्धव पोतदार, कृष्णात मेटील, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार विजय पाटील यांनी मानले.
सिद्धनेर्लीमध्ये कोविड योद्ध्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST