शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

धैर्यशील माने यांनी कामाला लागावे -आदित्य ठाकरे : लोकसभेच्या जिल्ह्यातील दोन्ही जागा महत्त्वाच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 01:06 IST

कोल्हापुरातील लोकसभेच्या दोन्ही जागा आमच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या असून, कोणत्याही परिस्थितीत येथून शिवसेनेचे खासदार निवडून आले पाहिजे, त्यासाठी ताकदीने बाहेर पडा, अशी स्पष्ट सूचना

कोल्हापूर : कोल्हापुरातील लोकसभेच्या दोन्ही जागा आमच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या असून, कोणत्याही परिस्थितीत येथून शिवसेनेचे खासदार निवडून आले पाहिजे, त्यासाठी ताकदीने बाहेर पडा, अशी स्पष्ट सूचना युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी धैर्यशील माने यांना दिल्या.

आदित्य ठाकरे मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. सायंकाळी शिवसेनेचे हातकणंगले लोकसभेचे संभाव्य उमेदवार धैर्यशील माने यांच्या रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी माने कुटुंबीयांच्यावतीने त्यांचे जोरदार स्वागत केले व त्यांचा सत्कार करण्यात आला. ठाकरे, धैर्यशील माने व माजी खासदार निवेदिता माने यांची १0 मिनिटे चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हातकणंगले मतदारसंघाचा आढावा घेतला. येथे तीन आमदार शिवसेनेचे असून, इतर मतदारसंघात कोठे पॅचवर्क करायचे ते सांगा, ‘मातोश्री’वरून ते केले जाईल. तुम्ही ताकदीने बाहेर पडा, लागेल ती मदत देऊ.

यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख संजय पवार, आमदार राजेश क्षीरसागर, उद्योजक श्रेणीक घोडावत, मुरलीधर जाधव, वेदांतिका धैर्यशील माने, निहारिका सत्वशील माने, राहुल चव्हाण, बबलू मकानदार, आदी उपस्थित होते.

दरम्यान, राजारामपुरी दुसºया गल्लीत शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.राजेश क्षीरसागर गाडीतच थांबलेदुर्गेश लिंग्रस यांनी उभा केलेल्या विरंगुळा केंद्राच्या उद्घाटनासाठी ठाकरे यांच्या वाहन ताफ्यातून आमदार राजेश क्षीरसागर तिथे आले; पण ताफ्यातून गाडी बाजूला घेऊन ते कार्यक्रमापासून दूर जाऊन थांबले. क्षीरसागर आणि लिंग्रस यांच्यतील मतभेद ठाकरे यांच्या समोरही कायम राहिल्याची चर्चा होती.

टॅग्स :PoliticsराजकारणAditya Thackreyआदित्य ठाकरे