शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

सीमाबांधवांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात परिषद

By admin | Updated: November 6, 2016 00:24 IST

सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत निर्णय : कर्नाटक पोलिसांनी क्रूर पद्धतीने केलेल्या मारहाणीचा निषेध; जशास तसे उत्तर देऊ : मुळीक

कोल्हापूर : काळा दिन पाळल्याबद्दल सीमाभागात मराठाबांधवांवर कर्नाटक पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचे पडसाद कोल्हापुरात उमटले. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवून सीमाबांधवांच्या समर्थनार्थ व कन्नडीगांचा निषेधासाठी कोल्हापुरात ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सीमा परिषद घेण्याचा निर्णय झाला. कर्नाटकच्या दडपशाहीला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिला.कर्नाटक पोलिसांचा निषेध करण्यासाठी व सीमाभागातील मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे राजर्षी शाहू स्मारक भवन येथे निषेध सभेचे आयोजन केले होते. बैठकीत कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिकांना क्रूर पद्धतीने केलेल्या मारहाणीचा निषेध करून विविध निर्णय घेण्यात आले. यामध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना भेटून त्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मारहाणीसंदर्भात बेळगावच्या पोलिस आयुक्तांची भेट घेऊया, जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देऊया, खासदार-आमदारांचा दबावगट निर्माण करण्यासाठी कोल्हापुरात सर्वपक्षीय बैठक घ्यावी, त्याचबरोबर सीमा लढ्याला पुन्हा एकदा पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरात व्यापक सीमा परिषद घ्यावी, अशा महत्त्वपूर्ण निर्णयांचा समावेश आहे.यावेळी माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या वाईट प्रवृत्तीचा निषेध आहे. प्रसाद जाधव यांनी प्रास्ताविक केले. बबनराव रानगे यांनी आभार मानले. शंकरराव शेळके,शिवाजी हिलगे, इंद्रजित सावंत, बाबा पार्टे, रघुनाथ कांबळे, डॉ. संदीप पाटील, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, सुखदेव बुध्याळकर, हर्षल सुर्वे, संजय काटकर, संग्रामसिंह निंबाळकर, साजिद खान, शिवाजी ससे, रणजित आयरेकर, शाहू जाधव, सोमनाथ घोडेराव, आनंद म्हाळुंगेकर, वैभव राजेभोसले, महादेव पाटील, अशोक माळी, अवधूत पाटील, संदीप पाटील, संतोष घाटगे, दीपा ढोणे, नेहा मुळीक, सुजाता चव्हाण, मंगल कुराडे, इंद्रजित पाटील, बळिराम देसाई, अशोक माळी, आदी उपस्थित होते.अनिल घाटगे, सुनीलकुमार सरनाईक, सचिन तोडकर, नगरसेविका रूपाराणी निकम, उदय लाड, शैलजा भोसले, संदीप पाटील, प्रसाद जाधव आदींनी सूचना केल्या. (प्रतिनिधी)खासदारांचा दबावगट हवा : ओऊळकरसीमा लढ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील खासदारांचा दिल्ली दरबारी दबाव गट निर्माण करावा, अशी सूचना माजी सहकार आयुक्त दिनेश ओऊळकर यांनी मांडली. मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कर्नाटक पोलिसांविरोधात कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊया, अशी सूचना संभाजीराव जगदाळे यांनी केली.कर्नाटकातील मराठी भाषिकांवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी शनिवारी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित निषेध सभेत मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शंकरराव शेळके, शैलजा भोसले, रूपाराणी निकम, दीपा पाटील, सचिन तोडकर, बाबा पार्टे, आर. के. पोवार, अ‍ॅड. पंडित सडोलीकर, डॉ. संदीप पाटील, आदी उपस्थित होते.