शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

गोठे येथील पेयजल योजनेच्या कामात भ्रष्टाचार

By admin | Updated: April 23, 2015 00:58 IST

माजी सरपंचांचा आरोप : बोगस कागदपत्रांचा वापर करून ग्रामस्थांसह शासनाची फसवणूक

कळे : गाठे (ता. पन्हाळा) येथील पेयजल योजनेच्या कामात बोगस कागदपत्रांचा वापर करून ग्रामस्थांसह शासनाची फसवणूक करून मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप माजी सरपंच सुनील पोतदार यांनी पत्रकार परिषदेत केला. यासंदर्भात शासनाच्या विविध कार्यालयात अर्ज देऊनही त्याची दखल घेतली गेली नाही. याची गांभीर्याने चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पोतदार यांनी दिला आहे.जॅकवेल बांधण्यासाठी ग्रामपंचायतीची स्वमालकीची जागा लागते. त्यासाठी धोंडिराम यशवंत पाटील यानी गट नं. १७६ ची जमीन ग्रामपंचायतीला बक्षीसपत्र करून दिली आहे. परंतु, प्रत्यक्षात गट नं १७ची जमीन बांधकामास प्रमाणित असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे; पण प्रत्यक्षात जॅकवेल बांधकाम वेगळ्याच गटनंबरमध्ये चालू आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेची फसवणूक केली असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत केला आहे.जॅकवेल बांधकाम चुकीच्या ठिकाणी सुरू असून, ते सर्व काम बंद ठेवण्याबाबत माजी सरपंच सुनील पोतदार यांनी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्याच्या चौकशीचे आदेश येऊनही वरिष्ठांच्या आदेशाची दखल न घेताच ग्रामपंचायत पेयजल योजना कमिटी व ठेकेदाराने काम सुरू केले असल्याचाही आरोप केला आहे.तसेच दि. १२/०८/२०१३ च्या ग्रामसभेत ठराव क्र. २० नुसार सामाजिक लेखा परीक्षण व नियंत्रण समिती गठित करण्यात आली होती. त्यामध्ये एका ग्रामपंचायत महिला सदस्याची बोगस सही केली असल्याची माहिती पोतदार यांनी देऊन पेयजल योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले. शासनाने चौकशी करून काम योग्य पद्धतीने करावे, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.पत्रकार बैठकीस शिवाजी पाटील, बी. एन. पाटील, जोतिराम पाटील, श्रीकांत पाटील, आनंदा शिंदे, सुरेश कांबळे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रात कोणत्याही प्रकारची बोगसगिरी नाही. आवश्यक ते बदल ग्रामपंचायत पेयजल योजना कमिटी व ग्रामीण पाणी पुरवठाविभागामार्फत सोयीनेच केले आहेत. शिवाय शासनाच्या आदेशानुसारच काम सुरू केले आहे. अद्याप कमिटीकडे कोणत्याही प्रकारचा निधी जमा झाला नसल्याने भ्रष्टाचार होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विरोधकांनी कितीही आकांडतांडव केले, तरी ग्रामस्थांच्या सहकार्याने गावासाठी नितांत आवश्यक असणारी पेयजल योजना पूर्ण करणारच. - संगीता पाटील, सरपंच, गोठे ग्रामपंचायत.