शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

 नगरसेवक संजय तेलनाडे बंधूसंह १८ जणांना मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 19:26 IST

खून, खुनी हल्ला, अपहरण, मारहाण, मटका-जुगाराचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ह्यएस. टी.ह्ण गँगचा म्होरक्या तसेच इचलकरंजी नगरपरिषदेचा पाणीपुरवठा सभापती संजय शंकर तेलनाडे, त्याचा भाऊ सुनील तेलनाडे, वकील पवनकुमार उपाध्ये यांच्यासह १८ जणांच्या विरोधात संघटित गुन्हेगारी मोक्का कारवाईच्या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी या मंजुरी दिली. अशी माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सोमवारी दिली. या कारवाईने इचलकरंजी परिसरात खळबळ उडाली आहे. 

ठळक मुद्दे नगरसेवक संजय तेलनाडे बंधूसंह १८ जणांना मोक्काइचलकरंजी परिसरात खळबळ

कोल्हापूर : खून, खुनी हल्ला, अपहरण, मारहाण, मटका-जुगाराचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ह्यएस. टी.ह्ण गँगचा म्होरक्या तसेच इचलकरंजी नगरपरिषदेचा पाणीपुरवठा सभापती संजय शंकर तेलनाडे, त्याचा भाऊ सुनील तेलनाडे, वकील पवनकुमार उपाध्ये यांच्यासह १८ जणांच्या विरोधात संघटित गुन्हेगारी मोक्का कारवाईच्या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी या मंजुरी दिली. अशी माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सोमवारी दिली. या कारवाईने इचलकरंजी परिसरात खळबळ उडाली आहे. कोल्हापुरातील कळंबा येथील मटका अड्ड्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे समजताच संजय तेलनाडे साथीदारांसह पसार झाला आहे. मोबाईल बंद करून तो आपले अस्तित्व लपवून राहत आहे. त्याचा साथीदार जावेद दानवाडे, नूर सय्यद यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. त्याने इचलकरंजीसह जयसिंगपूर, शिरोळ, कर्नाटकात मटक्याचे एजंट पेरले आहेत.

तेलनाडे याला मटकाचालक सलीम हेपरगी याच्या खूनप्रकरणी अटक केली होती. त्यातून तो निर्दोष बाहेर पडला आहे. त्यानंतर भरत त्यागी खूनप्रकरणी त्याला अटक झाली. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. इचलकरंजीमध्ये तो मटका किंग राकेश अग्रवाल याच्याशी हातमिळवणी करून मटका-जुगार चालवितो. येथील सराईत ह्यएस.टी.ह्ण गुन्हेगारी टोळीचा तो म्होरक्याही आहे. अनेक बेकार तरुणांना छोटे-मोठे उद्योगधंदे सुरू करून देत तो त्यांची फौज आपल्याभोवती फिरवितो. त्यामुळे इचलकरंजीमध्ये त्याला ह्यसरकारह्ण म्हणून ओळखले जाते.

जमिनी, स्थावर मालमत्ता, आलिशान गाड्या, आदी कोट्यवधींची माया त्याने अवैध व्यवसायांतून मिळविल्याची इचलकरंजीमध्ये चर्चा आहे. नुकताच शहापूर पोलीस ठाण्यात त्याच्यासह भाऊ सुनील तेलनाडे, वकील पवनकुमार उपाध्ये, हृषिकेश लोंढे, अरविंद मस्के, राकेश कुंभार, दीपक कोरे, इम्रान कलावंत, राहुल चव्हाण, अरिफ कलावंत, अभिजित जामदार, संदेश कापसे, दिगंबर शिंदे यांच्यासह साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. तेलनाडेचे उपद्व्याप वाढत आहेत. त्याला रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी त्याच्यासह १८ साथीदारांच्या विरोधात संघटित गुन्हेगारी ह्यमोक्काह्ण कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर