शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

Coronavirus Unlock : इचलकरंजीत लॉकडाऊन कडक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 11:00 IST

इचलकरंजीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून हा समूह संसर्ग झाला आहे. त्यामुळे शहरातील नऊ कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कडक करावा, अशी मागणी नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी  जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी रुग्णाचा तपासणी अहवाल येण्यापूर्वीच प्रशासनाने मृतदेह ताब्यात देऊन चूक केली, असा आरोप केला.

ठळक मुद्देइचलकरंजीत लॉकडाऊन कडक करातपासणी अहवाल येण्यापूर्वीच प्रशासनाने मृतदेह ताब्यात देऊन चूक केली-धैर्यशील माने

कोल्हापूर : इचलकरंजीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून हा समूह संसर्ग झाला आहे. त्यामुळे शहरातील नऊ कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कडक करावा, अशी मागणी नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी  जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी रुग्णाचा तपासणी अहवाल येण्यापूर्वीच प्रशासनाने मृतदेह ताब्यात देऊन चूक केली, असा आरोप केला.इचलकरंजीमध्ये आठवड्यात ४० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून येथील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बैठक घेतली. यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, सीपीआर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक उपस्थित होत्या.यावेळी अलका स्वामी म्हणाल्या, इचलकरंजीत समूह संसर्ग सुरू झाल्याने येथे लॉकडाऊन कडक करणे गरजेचे आहे. अन्यथा मालेगाव आणि भिवंडीसारखी स्थिती होण्याची शक्यता आहे. ई-पासमुळे परजिल्ह्यांतून नागरिक येत असल्याने धोका अधिक आहे.खासदार धैर्यशील माने यांनी, शहरात सद्य:स्थितीत लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही; त्यामुळे सगळ्यांची मागणी लक्षात घेऊन नियमांची कडक अंमलबजावणी करावी. या काळात रॅपिड टेस्ट कराव्यात, अशी सूचना दिली; तसेच रुग्णाचा अहवाल येण्यापूर्वीच सीपीआरने मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देणे ही गंभीर चूक असल्याचा आरोप केला. यावर हर्षला वेदक यांनी मृतदेह ताब्यात दिल्याने संसर्ग वाढला नसल्याचे सांगितले.आमदार प्रकाश आवाडे यांनी शहरात नऊ कंटेन्मेंट झोन असूनही तेथे लॉकडाऊन नियमांची कडक अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सगळ्या सूचनांचा विचार करून निर्णय घेऊ, असे सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याichalkaranji-acइचलकरंजीcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर