शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Unlock : माहितीची सत्यता, विश्‍वासार्हतेसाठी मुद्रित माध्यमांवरच भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 17:21 IST

लॉकडाऊनमध्ये माहिती मिळविण्यासाठी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, वेब माध्यमांचा आधार घेण्यात आला; परंतु माहितीची सत्यता आणि विश्‍वासार्हता, आदींसाठी मुद्रित माध्यमांवरच लोकांची भिस्त आहे.

ठळक मुद्देमाहितीची सत्यता, विश्‍वासार्हतेसाठी मुद्रित माध्यमांवरच भिस्तशिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता अध्यासनाचे सर्वेक्षण

कोल्हापूर : लॉकडाऊनमध्ये माहिती मिळविण्यासाठी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, वेब माध्यमांचा आधार घेण्यात आला; परंतु माहितीची सत्यता आणि विश्‍वासार्हता, आदींसाठी मुद्रित माध्यमांवरच लोकांची भिस्त आहे.

या काळात इतर माध्यमांना वेळ देण्याचे प्रमाण वाढले असले, तरी वस्तुनिष्ठ माहितीसाठी लोक मुद्रित माध्यमांचाच आधार घेत असल्याचे स्पष्ट झाले. शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाने केलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणातून हा निष्कर्ष समोर आला आहे.

या अध्यासनाच्या ह्यपी. जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझमह्ण या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात हे सर्वेक्षण केले. त्यांनी लॉकडाऊनच्या काळात माध्यमांच्या वापरासंदर्भातील प्रश्‍नावली ऑनलाईन भरून घेतली. महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, गोवा राज्यांतील ३०० जणांनी ही प्रश्‍नावली भरून दिली. त्यांत गृहिणी, व्यापारी, अभियंते, विद्यार्थी, छोटे व्यावसायिक यांचा समावेश होता.

लॉकडाऊनच्या काळात विविध प्रसारमाध्यमांचा कशा पद्धतीने उपयोग केला जातो आहे, याचा अभ्यास अध्यासनाच्या वतीने या सर्वेक्षणातून करण्यात आला असल्याची माहिती या अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी दिली.प्रश्नावलीच्या विश्लेषणानंतरचे निष्कर्ष१) मुद्रित माध्यमे सर्वाधिक विश्‍वासार्ह असल्याचे मत ६९.३ टक्के उत्तरदात्यांनी नोंदवले. १९.६ टक्के लोकांनी इंटरनेट, मोबाईलवरील माहिती विश्‍वासार्ह आहे, असे म्हटले; तर, ८.१ टक्के जणांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील माहिती विश्‍वासार्ह वाटत असल्याचे मत व्यक्‍त केले. तीन टक्के लोकांना पारंपरिक माध्यमे विश्‍वासार्ह वाटतात.२) माहिती मिळविण्यासाठी ६३.२ टक्के लोक मराठी वृत्तवाहिन्या पाहतात. हिंदी आणि इंग्रजी वृत्तवाहिन्या पाहणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. स्थानिक भाषेतील माध्यमे वापरणे सोयीचे असल्याने बहुतेक लोक मराठी वृत्तवाहिन्या पसंत करीत आहेत. लॉकडाऊनपूर्वी वृत्तवाहिन्या पाहण्याची वेळ कमी होती. लॉकडाऊनच्या काळात वृत्तवाहिन्या पाहण्यासाठी दर्शकांकडून अधिकचा वेळ दिला जात आहे.३) लॉकडाऊनपूर्वी सोशल मीडियासाठी दिवसातील दोन ते चार तास वेळ देणाऱ्यांची संख्या २०.३ टक्के होती; पण लॉकडाऊनच्या काळात ही संख्या वाढून ३९.५ टक्के झाली. लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियापैकी व्हॉट्सअ‍ॅपचा (५५.७ टक्के) वापर सर्वाधिक होत असल्याचे अभ्यासात दिसून आले.वाचक, श्रोते, वापरकर्त्यांचा प्रतिसादपारंपरिक, मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि वेब माध्यमांना वाचक, श्रोते-दर्शक आणि वापरकर्ते कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे या संशोधनाचे उद्दिष्ट होते, असे डॉ. जाधव यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याShivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूरJournalistपत्रकार