शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Unlock : हॉटेल सुरु करण्याचीही व्यावसायिकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 17:26 IST

 कोल्हापूर जिल्ह्यातील दुकानांना सायंकाळी सातवाजेपर्यत परवानगी मिळावी, तसेच हॉटेल व्यवसाय सुरु व्हावेत यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी चर्चा करु व राज्य शासनाकडून मार्गदर्शन घेवून योग्य तो निर्णय घेवू अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

ठळक मुद्देहॉटेल सुरु करण्याचीही व्यावसायिकांची मागणीदुकानांची वेळ वाढवण्याबाबत योग्य तो निर्णय घेवू-जिल्हाधिकारी दौलत देसाई

 कोल्हापूर : जिल्ह्यातील दुकानांना सायंकाळी सातवाजेपर्यत परवानगी मिळावी, तसेच हॉटेल व्यवसाय सुरु व्हावेत यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी चर्चा करु व राज्य शासनाकडून मार्गदर्शन घेवून योग्य तो निर्णय घेवू अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.कोल्हापूर चेंबस ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीज तसेच कोल्हापूर हॉटेल मालक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेवून त्यांना या मागणीचे निवेदन दिले. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव उपस्थित होते.कोल्हापूर चेंबस ऑफ कॉमर्सने दिलेल्या निवेदनात व्यवसाय व उद्योगांना अधिक चालना देण्यासाठी सर्व व्यापारी आस्थापने व दुकानांना सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची व हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेल सुरु करण्याची परवानगी मागितली आहे.

सध्या जिल्ह्यात चहागाडी, टपरीवाले, नाष्टा सेंटरवाले यांनी टेंम्पोसह अन्य गाड्यातून रस्त्याकडेला, चौक, बागा या ठिकाणी पार्सलच्या नावाखाली हॉटेलचा धंदा सुरु केला आहे. अनलॉकमध्ये सर्वच उद्योग व व्यवसाय सुरु झाल्याने हॉटेल व्यावसायिकांनाही मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याच्या अटीवर परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे.यावर जिल्हाधिकारी देसाई यांनी याबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करू तसेच राज्य शासनाकडून मार्गदर्शन घेवून निर्णय घेवू असे सांगितले. यावेळी चेंबर्सचे अध्यक्ष संजय शेटे, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्वल नागेशकर, आनंद माने, उदयसिंह निंबाळकर, सिद्धार्थ लाटकर, सचिन शानभाग, आशिष रायबागे, अरुण चोपदार यांच्यासह व्यावसायिक उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhotelहॉटेलkolhapurकोल्हापूर