शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

Coronavirus Unlock : लॉकडाऊन न पाळल्यास फौजदारी कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 11:13 AM

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे अन्यथा फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी दिला.

ठळक मुद्देलॉकडाऊन न पाळल्यास फौजदारी कारवाई : जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा नियमांचे पालन करण्याचे आवाहन

कोल्हापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे अन्यथा फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी दिला.कोरोना संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने लॉकडाऊन ३१ जूलैैपर्यंत वाढवले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी हा निर्णय मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला. यानुसार नागरिकांनी सार्वजनिक तसेच कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, दुकानदार व ग्राहकांमध्ये ६ फुटापेक्षा जास्त अंतर राखणे बंधनकारक असेल. लग्न सोहळ्यासाठी व अंत्यसंस्कारासाठी ५० नातेवाईकांना परवानगी असेल.दैनंदिन पास ३१ जुलैपर्यंतकोल्हापूरला लागून असलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच कामगारांना ये-जा करण्यासाठी आता ३१ जूलैपर्यंत दैनंदिन पास देण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील आस्थापनांसाठी जिल्हा उद्योग केंद्र, सर्व शासकीय विभाग व बँंकांसाठी करवीर, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा आणि शाहूवाडीचे तहसिलदार, खासगी शाळा, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालयांसाठी गट शिक्षणाधिकारी यांना पास देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर