बेळगाव : कर्नाटकात दुपारी १२ वाजेपर्यंत राज्यात नव्याने १७८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २७११ इतकी झाली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांपैकी तब्बल १५७ महाराष्ट्र रिटर्न आहेत.राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार काल गुरुवार सायंकाळी पाच वाजल्यापासून आज शुक्रवार दि. २९ मे दुपारी १२ वाजेपर्यंत राज्यात १७८ कोरोनाग्रस्त आढळून आले असून यामध्ये १११ पुरुष आणि ६७ महिलांचा समावेश आहे. तसेच यापैकी सर्वाधिक म्हणजे १५७ जण महाराष्ट्रातून आलेले नागरिक आहेत. आज दुपारपर्यंत आणखी ३५ रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या ८६९ इतकी झाली आहे. राज्यात अॅक्टिव्ह केसेस १७९३ इतक्या असून आतापर्यंत ४७ जणांचा मृत्यू झाला आहे.काल गुरुवार सायंकाळपासून राज्यात सर्वाधिक बाधित रुग्ण रायचूर (६२) व यादगीर (६0) या जिल्ह्यांमध्ये आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे कलबुर्गी व उडपी जिल्ह्यातील प्रत्येकी १५ रुग्णांसह बेंगलोर शहर, बेंगलोर ग्रामीण, मंड्या, दावणगिरी, म्हैसूर, शिमोगा, चित्रदुर्ग, चिकबळ्ळापूर व धारवाड जिल्ह्यामध्ये उर्वरित कोरोनाबाधित सापडले आहेत.
CoronaVirus :कर्नाटकात नव्या १७८ रुग्णांपैकी तब्बल १५७ महाराष्ट्र रिटर्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 19:08 IST
कर्नाटकात दुपारी १२ वाजेपर्यंत राज्यात नव्याने १७८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २७११ इतकी झाली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांपैकी तब्बल १५७ महाराष्ट्र रिटर्न आहेत.
CoronaVirus :कर्नाटकात नव्या १७८ रुग्णांपैकी तब्बल १५७ महाराष्ट्र रिटर्न!
ठळक मुद्देकर्नाटकात नव्या १७८ रुग्णांपैकी तब्बल १५७ महाराष्ट्र रिटर्न!कर्नाटकातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २७११