शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

CoronaVirus News: कोल्हापूरमधील 123 गावांनी कोरोनाला रोखले वेशीवरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 04:06 IST

ग्रामस्थांची एकजूट, प्रशासनाची साथ, प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे यश

कोल्हापूर : ग्रामस्थांची एकजूट, प्रशासनाची साथ आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या जोरावर जिल्ह्यातील १,२२५ गावांपैकी १२३ गावांनी कोरोनाला रोखण्यात यश मिळविले आहे. गेल्या वर्षभरात या गावात एकाही ग्रामस्थाला कोरोनाची बाधा झालेली नाही. जिल्ह्यातील बारापैकी दहा तालुक्यांमध्ये ही परिस्थिती असून, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांतील सर्वच गावांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.जिल्ह्यात २६ मार्च २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तो पुण्याहून कोल्हापुरात आला होता. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात ५२ हजार ७५४ रुग्ण नोंदविण्यात आले असून, त्यापैकी ४९ हजार ८५२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १११४ जण उपचार घेत असून, आतापर्यंत १७८८ जणांचा मृत्यू झाला आहे.सांगली जिल्ह्यात ३३ गावांमध्ये एकही रुग्ण नाहीसांगली : जिल्ह्यातील ६९९ गावांपैकी केवळ ३३ गावांनीच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रभावी अंमलबजावणी करून कोरोनाचा संसर्ग गावाच्या वेशीवरच रोखला आहे. याकामी आशा, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविकांची खूप मदत झाल्याचे सरपंच आणि ग्रामसेवकांनी सांगितले.सातारा जिल्ह्यातील १०१ गावांना मागमूसही नाहीसातारा : जिल्ह्यातील १०१ गावांत कोरोनाचा शिरकावही झालेला नाही. जिल्ह्यातील १,४९२ पैकी १३९१ गावांत कोरोना विषाणू पोहोचलाय. यामध्ये सर्वाधिक बाधित गावे ही सातारा, पाटण आणि कऱ्हाड या तालुक्यांतच आहेत.सिंधुदुर्गात ३१७ गावांत कोरोना नाहीसिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ३१७ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले आहे, तर उरलेली ४२४ गावे ही कोरोनाबाधित झाली आहेत.प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन केल्यामुळे आणि ग्रामस्थांनी एकजूट राखत चांगली भूमिका घेतल्यामुळेच हे शक्य झाले.- भरमू जाधव, सरपंच, बिद्रेवाडी, जि. कोल्हापूर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या