शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : जागतिक वसुंधरा दिवस- राधानगरी जंगलातील पाणवठे पुनर्जीवित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 18:02 IST

जागतिक वसुंधरा दिवसाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी अभयारण्य परिसरात दरवर्षी प्रमाणे बायसन नेचर क्लबच्या वतीने पाणवठा स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेमुळे अनेक पाणवठे पुनर्जिवित होत आहेत.

ठळक मुद्देराधानगरी जंगलातील पाणवठे पुनर्जीवित होणारपाणवठे स्वच्छता मोहिमेस प्रारंभ; बायसन नेचर क्लबचा उपक्रम

कोल्हापूर : जागतिक वसुंधरा दिवसाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी अभयारण्य परिसरात दरवर्षी प्रमाणे बायसन नेचर क्लबच्या वतीने पाणवठा स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेमुळे अनेक पाणवठे पुनर्जिवित होत आहेत.कोरोनो विषाणू रोखण्यासाठी लागू झालेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी अभयारण्य परिसरात पर्यटकांऐवजी प्राणी आणि पक्षी मुक्त संचार करत असल्याचे चित्र नित्याचे दिसत आहे. असे असले तरी पाण्याअभावी मात्र त्यांचे हाल होत आहेत. अनेक प्राणी पाण्यासाठी गावाजवळील शेतात आल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे.

यामुळे बायसन नेचर क्लबच्या कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करून हे पाणवठे आज स्वच्छ केले. जागतिक वसुंधरा दिनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून वेगवेगळे पाणवठे स्वच्छ करण्याचे क्लबचे नियोजन करण्यात आले आहे.या मोहिमेत नेचर क्लबचे अध्यक्ष सम्राट केरकर, रुपेश बोंबाडे, गणेश डब्बे, अक्षय केरकर,सनथ केरकर यांनी भाग घेतला.जंगल पठारावरील पाणवठे पाण्याने भरणारवन्यजीव विभागाने परवानगी दिली तर लवकरच टँकरद्वारेही जंगल पठारावरील पाणवठ्यात पाणी सोडण्यात येणार आहे. या मोहिमेत गतवर्षी वेगवेगळ्या दानशूर व्यक्ती,संस्थांच्या मदतीतून ४० टँकर पाणी पाणवठ्यावर टप्या टप्याने सोडण्यात आले होते.बायसन नेचर क्लबचा उपक्रमजंगल परिसरातील पाणवठे स्वच्छ करण्याची ही मोहीम व्यापक प्रमाणात नेचर क्लबतर्फे दरवर्षी राबवण्यात येते. याहीवर्षी नेचर क्लबने ही मोहिम सुरु केली आहे.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याradhanagari-acराधानगरीforestजंगलkolhapurकोल्हापूर