शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : जिल्ह्यातील सव्वा लाख जणांना तीन महिन्यांची पेन्शन मिळणार एकदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 15:21 IST

श्रावणबाळ निवृत्तिवेतन, संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तिवेतन, आदींसह विविध योजनांची एप्रिल, मे व जून महिन्यांची पेन्शन व अर्थसाहाय्याची रक्कम एकाच वेळी जमा करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे. याचा लाभ जिल्ह्यातील एक लाख ३० हजार ८ जणांना होणार आहे. ही रक्कम या महिन्यातच जिल्हा प्रशासनाकडून जमा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सव्वा लाख जणांना तीन महिन्यांची पेन्शन मिळणार एकदम ‘श्रावणबाळ’, ‘संजय गांधी’सह इतर योजनांच्या लाभार्थ्यांचा समावेश

प्रवीण देसाई कोल्हापूर : श्रावणबाळ निवृत्तिवेतन, संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तिवेतन, आदींसह विविध योजनांची एप्रिल, मे व जून महिन्यांची पेन्शन व अर्थसाहाय्याची रक्कम एकाच वेळी जमा करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे. याचा लाभ जिल्ह्यातील एक लाख ३० हजार ८ जणांना होणार आहे. ही रक्कम या महिन्यातच जिल्हा प्रशासनाकडून जमा करण्यात येणार आहे.कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करता, केंद्र सरकारने इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना तसेच राज्य सरकारने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जून महिन्यांतील अर्थसाहाय्य व पेन्शन एकत्रित जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

ही रक्कम महिनाअखेर जमा होणार आहे. याचा जिल्ह्यातील विविध योजनांच्या एक लाख ३० हजार ८ जणांना लाभ होणार आहे. नियमित अर्थसाहाय्य व पेन्शनसोबतच केंद्र सरकारने केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांसाठी नियमित पेन्शनव्यतिरिक्त ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एप्रिल व मे या दोन्ही महिन्यांचे प्रत्येकी ५०० रुपये अनुदान हे मे महिन्यात देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

केंद्र व राज्य सरकारच्या आदेशांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष साहाय्य योजनेचे उपसचिव एस. जी. पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला पत्राद्वारे दिले आहेत.लाभार्थ्यांना मिळणारी पेन्शन अशीकेंद्र सरकारपुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ८०० ते १००० रुपयांपर्यंत पेन्शन मिळते; तर राज्य सरकारपुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेतील लाभार्थ्यांना १००० ते १२०० रुपयांची पेन्शन दिली जाते.

सरकारने तीन महिन्यांची पेन्शन लाभार्थ्यांना एकदम देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे; परंतु ही रक्कम पोस्टामार्फत थेट लाभार्थ्यांच्या घरी पोहोच करावी. केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारनेही सानुग्रह अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावे.- किशोर घाटगे, अध्यक्ष, कोल्हापूर उत्तर संजय गांधी निराधार योजना समिती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर