शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : शिवाजी विद्यापीठ परिसरात आढळला स्थलांतरित पक्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 16:59 IST

रूडी शेलडक (टॅडोर्ना फेरुनिया) नावाचा स्थलांतरित पक्षी शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात प्राणीशास्त्र अधिविभागातील संशोधकांना आढळला. अलीकडच्या काळात प्रथमच हा पक्षी विद्यापीठ परिसरात निदर्शनास आल्याचे या संशोधकांनी म्हटले आहे.  शनिवारी साजऱ्या होणाऱ्या जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाच्या पार्श्वभूमीवर प्राणीशास्त्र अधिविभागाकडून ही माहिती देण्यात आली.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठ परिसरात आढळला स्थलांतरित पक्षीप्राणीशास्त्र विभागातील सुनील गायकवाड यांच्याकडून नोंद 

कोल्हापूर : रूडी शेलडक (टॅडोर्ना फेरुनिया) नावाचा स्थलांतरित पक्षी शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात प्राणीशास्त्र अधिविभागातील संशोधकांना आढळला. अलीकडच्या काळात प्रथमच हा पक्षी विद्यापीठ परिसरात निदर्शनास आल्याचे या संशोधकांनी म्हटले आहे.  शनिवारी साजऱ्या होणाऱ्या जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाच्या पार्श्वभूमीवर प्राणीशास्त्र अधिविभागाकडून ही माहिती देण्यात आली.प्राणीशास्त्र अधिविभागातील प्रा. डॉ. सुनील एम. गायकवाड विद्यापीठ परिसरातील पृष्ठवंशीय प्राण्यांवर काम करत आहेत. रूडी शेलडक हा स्थलांतरित पक्षी त्यांना सर्वप्रथम ७ मार्चला वि. स. खांडेकर भाषा भवनच्या पिछाडीस असलेल्या तलावामध्ये आढळला.

ह्या पक्षाची नोंद करून त्यांनी त्याची छायाचित्रे घेतली. भारतातील अनेक स्थलांतरित पक्षांपैकी रुडी शेलडक असून त्याला भारतात ब्राह्मणी बदक म्हणूनही ओळखतात. या विशिष्ट पक्षाची लांबी २३ ते २८ इंच इतकी व वजन सव्वा किलो असते. त्याचे डोके फिकट गुलाबी असून पिसे नारंगी-तपकिरी रंगाची तर शेपटीकडील पिसे काळी असतात.

हा प्रवासी पक्षी आहे. तो भारतीय उपखंडांत हिवाळ्यात आगमन करतो आणि एप्रिलमध्ये परत जातो. हा सुमारे २६०० किलोमीटर इतका प्रवास करू शकतो आणि जवळपास ६००० मीटर इतक्या उंचीवर पोहोचू शकतो. जगामध्ये याचा आढळ उत्तर-पश्चिम आफ्रिका, इथिओपिया, दक्षिण-पूर्व युरोप ते मध्य-आशिया ओलांडून दक्षिण-पूर्व चीनपर्यंत व दक्षिण आशियामध्ये आहे.

बौद्ध लोक या पक्षास पवित्र मानतात. त्यामुळे मध्य व पूर्व आशियामध्ये या पक्ष्यांना काही प्रमाणात संरक्षण मिळते. जिथे यांची संख्या स्थिर किंवा वाढत असल्याचे मानले जाते. हा बदक मुख्यत: तलाव, जलाशय आणि नद्यांसारख्या पाणथळ जागी राहतो, अशी माहिती डॉ. गायकवाड यांनी शुक्रवारी दिली.बर्ड्स कनेक्ट अवर वर्ल्डदरवर्षी ९ मे हा दिवस जागतिक स्थलांतरित पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या पक्षीदिनाचा विषय बर्ड्स कनेक्ट अवर वर्ल्ड असा आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbirds sanctuaryपक्षी अभयारण्यkolhapurकोल्हापूर