शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : दुकाने सुरू ‌ठेवण्याची वेळ रात्री आठपर्यंत वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 16:00 IST

  कोल्हापूर : शहरातील व्यापार, व्यवसाय सुरू ‌ठेवण्याची सध्याची सकाळी नऊ ते सायंकाळी पाच ही वेळ ग्राहक, व्यापारी आणि ...

ठळक मुद्देदुकाने सुरू ‌ठेवण्याची वेळ रात्री आठपर्यंत वाढवाकोल्हापूर चेंबरची मागणी : सध्याची वेळ गैरसोयीची

 कोल्हापूर : शहरातील व्यापार, व्यवसाय सुरू ‌ठेवण्याची सध्याची सकाळी नऊ ते सायंकाळी पाच ही वेळ ग्राहक, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी गैरसोयीची ठरणारी आहे. त्यामुळे या वेळेत रात्री आठपर्यंत वाढ करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा आणि महानगरपालिका प्रशासनाकडे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्यावतीने करण्यात आली आहे.लॉकडाऊनमुळे शहरातील विविध दुकाने, व्यापार, व्यवसाय हे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू ‌ठेवण्यास महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. त्यानुसार महाद्वार रोड, जोतिबा रोड, राजारामपुरी, शाहूपुरी, स्टेशन रोड, मध्यवर्ती बसस्थानक, राजाराम रोड, रेल्वे फाटक ते राजारामपुरी मार्ग, आदी परिसरातील शंभर टक्के दुकाने सुरू आहेत. पण, उन्हाचा तडाखा वाढत असल्याने दुपारी एकनंतर बहुतांश ग्राहक हे घरातून बाहेर पडत नाहीत.

उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर ते खरेदीसाठी बाजारपेठेत येत आहेत. तोपर्यंत दुकाने बंद करण्याची वेळ होते. त्याचा फटका व्यापार, व्यवसायाला बसत असून, उलाढालीचे प्रमाण ५० टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे दुकाने सुरू करण्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी व्यापारी, व्यावसायिकांकडून कोल्हापूर चेंबरकडे झाली.

ग्राहकांच्या सोयीसह व्यापार, व्यवसायाच्या चक्राला गती देण्यासाठी दुकाने सुरू ‌‌ठेवण्याच्या वेळेत बदल करण्यात यावा. ही वेळ सकाळी दहा ते रात्री आठ अशी करावी, अथवा दुकाने सुरू ठेवण्याचा कालावधी निश्चित करण्याचा अधिकार आम्हाला द्यावा, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कल्लशेट्टी यांच्याकडे केली असल्याचे कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी शुक्रवारी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर