शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : ‘लॉकडाऊन’ची पकड सैल होतेय, आता सगळेच कंटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 15:53 IST

ले महिनाभर प्रशासनाला मदत करणाऱ्या शहरवासीयांना आता लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. बाहेर जावे तर बंदी आणि घरात बसावे तर कमालीचा उष्मा अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे शहरवासीयच नाहीत, तर बंदोबस्तावरील पोलीसदेखील कंटाळले असल्याने ‘लॉकडाऊन’वरील पकड सैल होत आहे.

ठळक मुद्दे‘लॉकडाऊन’ची पकड सैल होतेयबंदोबस्तावरील पोलीसदेखील कंटाळले

कोल्हापूर : गेले महिनाभर प्रशासनाला मदत करणाऱ्या शहरवासीयांना आता लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. बाहेर जावे तर बंदी आणि घरात बसावे तर कमालीचा उष्मा अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे शहरवासीयच नाहीत, तर बंदोबस्तावरील पोलीसदेखील कंटाळले असल्याने ‘लॉकडाऊन’वरील पकड सैल होत आहे.कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात सापडलेल्या दहापैकी तीन कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, सात रुग्णांची प्रकृती सुधारत आहे. या रुग्णांपासून होणारा संसर्ग रोखण्यात सीपीआर तसेच जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या सतरा अठरा दिवसांत जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळलेला नाही.जिल्ह्यातील परिस्थिती सुधारत असल्यामुळे सर्वच पातळीवर थोडी शिथिलता येऊ लागली आहे. घरात बसून शहरवासीय कंटाळले आहेत, तर चोवीस तास उन्हातान्हात बंदोबस्त करून पोलिसांचीही दमछाक होऊ लागली आहे. म्हणूनच ‘लॉकडाऊन’ची पकड सैल होताना पहायला मिळत आहे.त्याचा परिणाम म्हणून खरेदीच्या निमित्ताने शहरातील गर्दीही हळूहळू वाढू लागली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर करुनही काहीजण नियम पाळण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. दुचाकीवरून एकानेच प्रवास करायचा आहे, तरीही दोघे बसून प्रवास करीत आहेत. चारचाकी वाहनातून फक्त दोघांनाच आणि तेही चालक बसल्यावर त्याच्या मागे दुसऱ्याने बसायचे आहे. पण हा सुध्दा नियम बासनात गुंडाळून ठेवला जात आहे.

किराणा मालाची दुकाने तसेच धान्याच्या, मिरच्यांच्या दुकानासमोर गर्दी वाढलेली असून, या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवण्याचा नियम देखील पायदळी तुडविला जात आहे.पुन्हा एकदा बाजारपेठेत हाच अनुभव आला. महापालिका प्रशासनाने गर्दी टाळण्याकरिता अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र शहरवासीयांचा तसेच भाजी विक्रेते, दुकानदारांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत.

या दिवसात मोठ्या प्रमाणात धान्य खरेदी केली जाते. घरोघरी मिरची कांडप, चटणीची कामे केली जातात. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन असल्यामुळे या नियमित कामांना ब्रेक लागला आहे. मात्र ही कामे करणेच आवश्यक असल्याने नागरिक मोठ्या संख्येने खरेदीला बाहेर पडत आहेत. प्रशासनाने सवलत दिली याचा अर्थ घालून दिलेले नियम पायदळी तुडवावेत, असे नाही तर ते अधिक जागरुकपणे पाळणे आवश्यक आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर