शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown :परराज्यांतील कामगारांनी कोल्हापुरातच राहणे केले पसंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 16:48 IST

कोरोना विषाणूमुळे बंद असलेले उद्योग पुन्हा सुरू झाल्याने रिकाम्या हातांना काम मिळाल्याने परराज्यांतील कामगार पुन्हा स्थिरावत आहेत. एकीकडे परराज्यांतील कामगार गावी जात असताना काही परराज्यांतील कामगारांनी या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतल्याचे पाहावयास मिळते.

ठळक मुद्देपरराज्यांतील कामगारांनी कोल्हापुरातच राहणे केले पसंत आयुष्यांच्या पेटवा मशाली : उद्योग सुरु झाल्याने हाताला मिळाले काम

प्रदीप शिंदेकोल्हापूर : कोरोना विषाणूमुळे बंद असलेले उद्योग पुन्हा सुरू झाल्याने रिकाम्या हातांना काम मिळाल्याने परराज्यांतील कामगार पुन्हा स्थिरावत आहेत. एकीकडे परराज्यांतील कामगार गावी जात असताना काही परराज्यांतील कामगारांनी या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतल्याचे पाहावयास मिळते.कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद ठेवण्यात आले होते. मात्र उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने पुन्हा कारखाने सुरू झाले आहेत. कामगारांना काम उपलब्ध होऊ लागले आहे.लॉकडाऊनदरम्यान हाताशी काम नसल्यामुळे परराज्यांतील अनेक कामगार आपापल्या मूळ गावाकडे परत निघाले आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता देण्यात आली. त्यानुसार व्यापार आणि उद्योग-धंदे सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बंद असलेले उद्योन आता नव्याने सुरू होऊ लागल्याने कामगारांना काम मिळू लागल्याने अनेकांंनी गावी जाण्याचा निर्णय बदलला आहे.कोरोना तो सभी जगह है....कोरोना सिर्फ महाराष्ट्र में है ऐसी बात नहीं... कोरोना तो सभी जगह है. गाँव जायेंगे तो वहां भी रहेगा, अशी बोलकी प्रतिक्रिया परराज्यांतील कामगारांनी व्यक्त केली. तसेच गावी जाऊन करायचे काय असा मुख्य प्रश्न त्यांच्यासमोर आहे. लॉकडाऊनमुळे बंद असलेले काम आता पुन्हा सुरू झाल्याने चार पैसे मिळत आहेत. त्यामुळे अशा संकटकाळातही काम करून चार पैसे मिळवून गावी पाठवू तर शकतो. त्यामुळे गावी जाण्याचा निर्णय आम्ही बदलला असल्याचे अनेक परराज्यांतील कामगारांनी सांगितले.

गावाकडे काम नाही म्हणून सात वर्षे पूर्वी कोल्हापुरात आलो आहे. कोल्हापूरची स्थिती चांगली असल्याने या ठिकाणी राहणे सुरक्षित वाटते. आता पुन्हा काम सुरू झाल्याने गावी जाण्याचा प्रश्नच येत नाही.मिथुन शेख, पुतीमरी, नदिया (राज्य प. बंगाल)

कोरोनाच्या भीतीमुळे गावी गेलो तर तिथे ही कोरोनाचा आहेच की, परत तिथे कोणतेही काम नसणार आणि कोरोनाचे संकट असे दुहेरी संकट डोक्यावर राहणार आहे. त्यापेक्षा या ठिकाणी काम उपलब्ध झाल्याने चार पैसे तरी घरी पाठवू शकतो.- अजय कुमार,जि. गया (राज्य बिहार)

कारखाने सुरू झाल्याने कामगारांना काम उपलब्ध झाले आहे. गावी जाऊन पुन्हा रोजगारांची प्रश्न असल्याने अनेकांनी गावी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या कारखान्यात परराज्यातील कामगार आहेत. यांच्या आरोग्य तपासणी केली आहे. यासह जेवण्याची व्यवस्था केली आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवून शिफ्टमध्ये काम सुरू आहेउत्तम जाधव, उद्योजक

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर