शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown :इचलकरंजीत रेशनधान्य दुकानदार आणि ग्राहकात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 17:10 IST

इचलकरंजी : किरकोळ कारणावरून येथील लालनगरमधील रेशनधान्य दुकानदार आणि ग्राहकात हाणामारी झाली. यावेळी संतप्त ग्राहकाने दुकानातील टेबल, खिडक्या आदीसह ...

ठळक मुद्देइचलकरंजीत रेशनधान्य दुकानदार आणि ग्राहकात हाणामारी परस्पर विरोधी तक्रारी दाखल

इचलकरंजी : किरकोळ कारणावरून येथील लालनगरमधील रेशनधान्य दुकानदार आणि ग्राहकात हाणामारी झाली. यावेळी संतप्त ग्राहकाने दुकानातील टेबल, खिडक्या आदीसह साहित्याची मोडतोड केली. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. त्याामुळे जवळच असलेल्या गावभाग पोलिसांनी तेथे धाव घेत हस्तक्षेप केला व गर्दी हटविली. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.नेहमी धान्य न मिळणाऱ्या केशरी शिधापत्रिकाधारकांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर 12 रुपये प्रमाणे गहू व 8 रुपये किलोने तांदूळ देण्यास शनिवार 25 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. येथील लालनगर परिसरात विनोद आवळे यांचे रेशनधान्य दुकान आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी त्याठिकाणी नफिसा शेख या धान्य आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आवळे यांनी माझ्याकडे फक्त तांदूळ आले आहे. आज किंवा उद्या गहू येणार असल्याने सोमवारपासून सर्वांना धान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले.

या कारणावरुन आवळे व शेख यांच्यात वाद झाला. त्या वादाचे पर्यावसान शिवीगाळ व हाणामारीत झाले. त्यातून शेख यांचा मुलगा अजीज व आवळे आणि त्यांची आई बेबी यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. यावेळी शेख याच्यासह त्याठिकाणी असलेल्या काहीजणांनी आवळे यांच्या दुकानातील टेबल, खिडकीसह अन्य साहित्याची तोडफोड करुन नुकसान केले. त्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला.

याबाबतची माहिती मिळताच गावभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दीला पांगविले. तसेच विनोद आवळे व अजीज शेख यांना ताब्यात घेतले. या दोघांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हे दाखल केले असून दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सपोनि गजेंद्र लोहार यांनी दिली.दुकान निश्‍चित वेळेत न उघडल्याने संतापलॉकडाऊन काळात इचलकरंजी शहर परिसरात सर्वच रेशनधान्य दुकान सकाळी 6 ते 10 या कालावधीत सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असे असतानाही इचलकरंजी-चंदूर रस्त्यावरील शाहूनगर भागातील रेशनधान्य दुकान शनिवारी सकाळी उशीरापर्यंत उघडण्यात आले नव्हते. सदरचे दुकान निश्‍चित वेळेत न उघडल्याने या दुकानासमोर पहाटेपासूनच रांगा लावून बसलेल्या ग्राहकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. याबाबत माहिती मिळूनही पुरवठा विभागाने कारवाई केली नव्हती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर