शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

CoronaVirus Lockdown : दुकाने सुरू करण्यावरून संभ्रम, काही ठिकाणची दुकाने सुरू, बहुतांश बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 16:22 IST

दुकाने सुरू ठेवायची की बंद याबाबत शनिवारी दिवसभर संभ्रमावस्था निर्माण झाली. एकीकडे केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने शुक्रवारी (दि. २४) रात्री उशिरा काही अटींवर दुकाने सुरू करण्यात येत असल्याचे जाहीर केले. दुसरीकडे, जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडून आदेश येत नाहीत तोपर्यंत दुकाने बंदच राहतील, अशी भूमिका घेतली. यामुळे काही ठिकाणी दुकाने सुरू, तर बहुतांश ठिकाणी बंद असे चित्र दिसून आले.

ठळक मुद्दे दुकाने सुरू करण्यावरून संभ्रम, काही ठिकाणची दुकाने सुरू, बहुतांश बंदराज्य शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा

कोल्हापूर : दुकाने सुरू ठेवायची की बंद याबाबत शनिवारी दिवसभर संभ्रमावस्था निर्माण झाली. एकीकडे केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने शुक्रवारी (दि. २४) रात्री उशिरा काही अटींवर दुकाने सुरू करण्यात येत असल्याचे जाहीर केले. दुसरीकडे, जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडून आदेश येत नाहीत तोपर्यंत दुकाने बंदच राहतील, अशी भूमिका घेतली. यामुळे काही ठिकाणी दुकाने सुरू, तर बहुतांश ठिकाणी बंद असे चित्र दिसून आले.केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी रात्री उशिरा एक आदेश जारी केला. त्यानुसार देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत असलेली सर्व दुकाने काही अटींवर सुरू करण्याची परवानगी दिली. मॉल्सवरील जीवनावश्यक वस्तू वगळता बंदी कायम ठेवली.

या आदेशानुसार महापालिका, नगरपालिका हद्दीतील सर्व दुकाने सुरू करता येणार होती. मात्र, दुपारी जिल्हा प्रशासनाने जोपर्यंत राज्य शासनाकडून आदेश येत नाही तोपर्यंत सर्व दुकाने बंदच राहतील, असे स्पष्ट केले. त्यामुळे सकाळच्या सत्रात सुरू केलेली दुकाने पुन्हा बंद करण्याची वेळ आली. 

कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरी आणि ग्रामीण भागांत काही दुकाने, आस्थापना सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे वृत्त प्रसारित झाले. मात्र, राज्य सरकार अशा प्रकारची अधिसूचना काढत नाही, तोपर्यंत संचारबंदीच्या काळात सुरू असलेले नियम तसेच राहतील. राज्य सरकारने अधिसूचना काढल्याशिवाय कोणीही अशा प्रकारच्या आस्थापना, दुकाने सुरू करू नयेत.- दौलत देसाई, जिल्हाधिकारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर