शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

CoronaVirus Lockdown : सलून व्यावसायिकांचा आक्रमक पवित्रा, दसरा चौकात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 16:45 IST

गेल्या अडीच महिन्यांपासून व्यवसाय बंद राहिल्याने सलून व्यावसायिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी ऐतिहासिक दसरा चौकात जागर, मूक आंदोलन करीत शासनाचा निषेध केला. काळ्या फिती, काळे झेंडे आणि तोंडाला काळे मास्क लावून शेकडो सलून व्यावसायिक येथे जमा झाले. सोमवार (दि. १५) पासून दुकाने सुरू करण्याचा निर्धारही करण्यात आला.

ठळक मुद्देसोमवारी कोणत्याही परिस्थितीत दुकाने सुरू करण्याचा निर्धारकाळ्या फिती, काळे झेंडे आणि काळे मास्क लावून शासनाचा निषेध

कोल्हापूर : गेल्या अडीच महिन्यांपासून व्यवसाय बंद राहिल्याने सलून व्यावसायिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी ऐतिहासिक दसरा चौकात जागर, मूक आंदोलन करीत शासनाचा निषेध केला. काळ्या फिती, काळे झेंडे आणि तोंडाला काळे मास्क लावून शेकडो सलून व्यावसायिक येथे जमा झाले. सोमवार (दि. १५) पासून दुकाने सुरू करण्याचा निर्धारही करण्यात आला.केंद्र शासनाने सलून व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची मुभा दिली आहे. तरीही राज्य शासनाने सलून व्यवसाय हा पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांवर आर्थिक संकट आले आहे. उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. नियम व अटींचे पालन करून व्यवसाय सुरू करू, अशी मागणी वारंवार करूनही जिल्हा प्रशासनाने सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली नसल्यामुळे सलून व्यावसायिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, शुक्रवारी सकाळी १० वाजता दसरा चौक येथे शासनाविरोधात जागर व मूक आंदोलन केले. हातात काळे झेंडे, काळी फीत, काळे मास्क आणि काळे रुमाल दाखवीत त्यांनी शासनाचा निषेध केला.जिल्ह्यातून शेकडो सलून व्यावसायिक एकत्र जमा झाल्याने पोलीस प्रशासनाने त्यांना घरी जाण्याचे आवाहन केले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, शिवसेना शहरप्रमुख रवी इंगवले, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंत मुळीक, नगरसेवक ईश्वर परमार, गुलाबराव घोरपडे हे आले.याचबरोबर नाभिक समाजाचे विभागीय अध्यक्ष मारुती टिपुगडे, नाभिक समाज जिल्हाध्यक्ष सयाजी झुंजार, श्री संत शिरोमणी सेना महाराज नाभिक युवा संस्था आणि संस्थेचे अध्यक्ष मोहन चव्हाण, उपाध्यक्ष दीपक खराडे, सेक्रेटरी संदीप शिंदे, लक्ष्मण फुलपगारे, संभाजी संकपाळ, बाबासाहेब काशीद, राहुल टिपुगडे, सोमनाथ गवळी, गणेश जाधव, संतोष चव्हाण, सागर टिपुगडे, गणेश खेडकर, प्रमोद खेडकर, सचिन यादव यांच्यासह जिल्ह्यातील नाभिक समाजबांधव उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर