शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

CoronaVirus Lockdown : ३५०० कर्मचारी भरउन्हात म्हणून ३९ लाख नागरिक घरी निवांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 15:21 IST

‘लॉकडाऊन’मुळे आज अत्यावश्यक सेवा वगळता ३९ लाख नागरिक घरात बंदिस्त पण निवांत जीवन जगत आहेत, त्याला महावितरणच्या ३५०० कर्मचाऱ्यांची सेवा कारणीभूत ठरली आहे. वीजेसारखी अत्यावश्यक सेवा विनाखंड पुरवण्यासाठी उन्हातान्हात हे कर्मचारी फिरत असल्याने आज निवांतपणाचे सुख जनता अनुभवत आहे. या उन्हाच्या तडाख्यात वीजच नसती तर काय झाले असते याची कल्पना सुध्दा करवत नाही, त्यामुळे या राबणाºया हातांना सलाम ठोकावाच लागेल.

ठळक मुद्देअखंड विजेसाठी राबताहेत महावितरणचे कर्मचारीजिल्ह्यात ११ लाख २६ हजार वीज ग्राहकांना सेवा

नसिम सनदीकोल्हापूर : ‘लॉकडाऊन’मुळे आज अत्यावश्यक सेवा वगळता ३९ लाख नागरिक घरात बंदिस्त पण निवांत जीवन जगत आहेत, त्याला महावितरणच्या ३५०० कर्मचाऱ्यांची सेवा कारणीभूत ठरली आहे. वीजेसारखी अत्यावश्यक सेवा विनाखंड पुरवण्यासाठी उन्हातान्हात हे कर्मचारी फिरत असल्याने आज निवांतपणाचे सुख जनता अनुभवत आहे. या उन्हाच्या तडाख्यात वीजच नसती तर काय झाले असते याची कल्पना सुध्दा करवत नाही, त्यामुळे या राबणाºया हातांना सलाम ठोकावाच लागेल.महावितरणकडून जिल्ह्यातील ११ लाख २६ हजार ४१७ ग्राहकांना विजेचा नियमित पुरवठा केला जातो. ‘लॉकडाऊन’मुळे सर्व यंत्रणा ठप्प झाल्या असताना महावितरण मात्र अखंडपणे आपल्या कामात मग्न आहे. ‘कोरोना’पासून बचावासाठी सुरक्षा साधने, परस्परांमध्ये अंतर ठेवणे, कार्यालयात कमी कर्मचारी राहतील, अधिकारी आॅनलाईनच संपर्क साधतील, असे नियोजन करून ग्राहकांना वीज सेवा अखंडपणे सुरू राहील यासाठी दक्षता घेतली.

त्यामुळे आज लॉकडाऊनची घोषणा होऊन ९ दिवस झाले तरी कोठेही महावितरणच्या सेवाबद्दल तक्रार आली नाही. कुठे वीज पुरवठा खंडित झाला असेल तर एका तासाच्या आत ते काम पूर्ण करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे.घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक, कृषी अशा ग्राहकांना वीज पुरवण्यासाठी वायरमन, आॅपरेटर, इंजिनिअर हे प्रत्यक्ष फील्डवर तर कार्यालयात काम करण्यासाठी रोज तीन ते चार कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास राखीव कर्मचारीही तयार आहेत. या सर्वांना अत्यावश्यक सेवेचे पास दिले आहेत.मास्क व सॅनिटायझरसाठी एक हजार रुपयेमास्क आणि सॅनिटायझर खरेदी करण्यासाठी वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना महावितरणकडून प्रत्येकी एक हजार रुपये देण्यात आले आहेत.पोलिसांकडून दंडाची पावतीअत्यावश्यक सेवा बजावत असतानाही पोलिसांकडून अडवणूक होण्याचे प्रकार घडू लागल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. जयसिंगपूरमध्ये असाच वीज पुरवठा सुरळीत करून परतत असताना पोलिसांनी गाडी रोखून दंडाची पावतीही फाडली आहे.‘महावितरण’कडून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचीही काळजी घेतली जात आहे. ग्राहकांना अखंड सेवा देतानाच या कर्मचाऱ्यांना मास्कसह अन्य सुरक्षा साधने दिली आहेत. ग्राहकांनी महावितरणच्या या कर्मचाऱ्यांच्या योगदानाची कदर करावी एवढीच अपेक्षा आहे.सागर म्हारुलकर, अधीक्षक अभियंता, महावितरण

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर