शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न; मराठा आंदोलनावरून नितेश राणेंचा दावा
2
कोट्यवधीचे दागिने, पोर्श, BMW सारख्या १० लग्झरी कार अन् रोकड...: ED च्या धाडीत सापडला 'खजिना'
3
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
4
Nagpur Crime: ...अन् गर्लफ्रेंडच्या हत्येसाठी त्याने ऑनलाईन मागवला चाकू, एंजेलच्या हत्येपूर्वी काय काय घडलं?
5
निक्की मृत्यू प्रकरण: पेनड्राइव्ह अन् डॉक्टरच्या जबाबामुळे विपिनची फॅमिली सेफ; पुन्हा नवीन वळण
6
रिलायन्ससह टॉप १० पैकी ८ कंपन्यांचे २.२५ लाख कोटी रुपये बुडाले; फक्त 'या' २ कंपन्यांनीच कमावला मोठा नफा
7
Ratnagiri Crime: 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?
8
Amit Shah: मुंबईकरांना बदल हवा, कामाला लागा; अमित शाहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र!
9
भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार; RBI गव्हर्नर मल्होत्रांचा मोठा दावा, कुणाला दिलं श्रेय?
10
एअर इंडियाच्या विमानाचे आपात्कालीन 'लँडिंग'; हवेत असतानाच इंजिनला लागली आग, प्रवासी सुखरूप
11
टॅरिफ वॉरदरम्यान PM मोदी आणि जिनपिंग यांची भेट; चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले,'एकत्र येणे महत्त्वाचे'
12
फक्त १ लाख रुपये जमा करून मिळवा १४,३२५ रुपये निश्चित व्याज! कॅनरा बँकेने आणखी खास FD योजना
13
'त्या' महिला पोलीस निरीक्षकाची बदली मॅटकडून रद्द
14
"आमच्या मालिकेवेळी तिला पुन्हा कॅन्सर...", प्रिया मराठेच्या निधनानंतर सुबोध भावेची भावुक पोस्ट
15
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत खेळणार की नाही? जाणून घ्या
16
वर्दळीच्या सायन-पनवेल महामार्गावरील खाडीपुलावर गाड्यांची लांबचलांब रांग!
17
जि.प.च्या शाळेने सुरू केली सायकल बँक; कष्टकऱ्यांच्या लेकरांची थांबली पायपीट!
18
"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं
19
Maharashtra Rains: महाराष्ट्रात पावसाचा कहर, तुमच्या जिल्ह्यात किती टक्के बरसला? जाणून घ्या आकडा
20
नंदुरबारमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास

CoronaVirus : स्वत: सुरक्षित राहा, गावाला सुरक्षित ठेवा, जिल्हाधिकाऱ्यांचा कानमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 17:55 IST

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या या टप्प्यावर सामाजिक संसर्ग आणि मृत्यू रोखण्यासाठी ग्रामसमित्यांची सतर्कता खूप महत्वाची आहे. या पार्श्वभूमीवर स्वत: सुरक्षित राहा, गावालाही सुरक्षित ठेवा, आपत्तीला पळवून लावा असा कानमंत्र स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी दिला.

ठळक मुद्देस्वत: सुरक्षित राहा, गावाला सुरक्षित ठेवा, जिल्हाधिकाऱ्यांचा कानमंत्र सामाजिक संसर्ग, मृत्यू रोखण्यासाठी ग्रामसमित्यांची सतर्कता महत्वाची

कोल्हापूर: कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या या टप्प्यावर सामाजिक संसर्ग आणि मृत्यू रोखण्यासाठी ग्रामसमित्यांची सतर्कता खूप महत्वाची आहे. या पार्श्वभूमीवर स्वत: सुरक्षित राहा, गावालाही सुरक्षित ठेवा, आपत्तीला पळवून लावा असा कानमंत्र स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी दिला.कोरोना बाधीतांचा आकडा ५५० च्या पुढे गेल्याने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेऊन गावचे सरपंच, आशा कर्मचारी, ग्रामसमिती सदस्य, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेव, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी, मंडल अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारा संवाद साधून त्यांना आश्वस्थ केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिका आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ. योगेश साळे यांनीही मार्गदर्शन केले.जिल्हाधिकारी म्हणाले, आतापर्यंत चांगल्याप्रकारे परिस्थिती हाताळल्याने त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. निगेटीव्ह अहवाल घेऊन येणाऱ्या व्यक्तीलाही क्वारंन्टाईन करा, त्यांना बाहेर फिरु देऊ नका. बाहेरुन येणाऱ्यांना सक्तीने अलगीकरण करा. क्वारन्टाईनमधील व्यक्तींची दररोज एमपीडब्ल्यू, एएनएम, आशा, अंगणवाडी सेविका, खासगी, शासकीय डॉक्टर, यांच्यामार्फत वैद्यकीय तपासणी करा. लक्षणे आढळल्यास सीपीआर, डी.वाय.पाटील हॉस्पीटल अथवा कोव्हीड रुग्णालयात दाखल करा.मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, बाहेरुन येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने नियमांचे पालन करणाऱ्यांनाच घरी अलगीकरणात ठेवा, अन्यथा स्वॅब घेऊन त्यांना संस्थात्मक अलगीकरण करा. आयुषचे सर्वेक्षण पूर्ण करुन ५० वर्षापुढील व क्वारन्टाईन व्यक्तींना संजीवनी वटी, आर्सेनिक अल्बम ३० औषधे द्या. कोरोनाबरोबरच डेंग्यू, उष्माघात, स्वाईनफ्लूची काळजी घ्या. क्वारन्टाईन कक्षात पाण्याची सोय करा, डासप्रतीबंध फवारणी करा.जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणाले, खडतर कालावधी सुरु झाला असून खासगी डॉक्टरांनीही वैद्यकीय कामासाठी हातभार लावावा. बाहेरुन येणाऱ्या, बाधीत व्यक्तींना ग्रामसमितीच्या परवानगीनेच गृह की संस्थात्मक अलगीकरण यांचा निर्णय घ्यावयाचा आहे. आशा, सेविकांनाी काटेकोर सर्वेक्षण केल्यास रुग्ण शोधणे सोपे होणार आहे.चालकांना क्वारन्टाईनचमालवाहतूक दूध वाहतूक टँकरचालकांना गावामध्येच स्वतंत्र राहण्याची व्यवस्था करा. त्यांना तशी कल्पना द्या. परजिल्ह्यातून प्रवास करुन येणाऱ्यांचा कुटूंब अथवा गावातील लोकांशी संपर्क टाळा, अशा सुचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.दारात साबण, पाणी ठेवाकोरोनाचा विषाणू साबण आणि सॅनिटायझरलाच घाबरतो, त्यामुळे घरात येताना साबणाने हातपाय धुवूनच यावे, सॅनीटायझरही वापरावे. पुर्वी दारात पाणी ठेवले जाई, आत तसेच करण्याची वेळ आली आहे. याचे तंतोतन पालन करा, अशा सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर